AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेकडून रविंद्र वायकर आणि यामिनी जाधव यांना तिकीट, निरुपम यांचा पत्ता कट

मुंबईतील लोकसभेच्या सहा जागांच्या लढती आज स्पष्ट झाल्या आहेत. महायुती आणि महाविकासआघाडीचा मुंबईतील जागांचा सस्पेंस अखेर संपला आहे. आज मुंबईतील सर्व जागांवरील उमेदवारांची घोषणा झाली आहे.

शिवसेनेकडून रविंद्र वायकर आणि यामिनी जाधव यांना तिकीट, निरुपम यांचा पत्ता कट
shailesh musale
shailesh musale | Updated on: Apr 30, 2024 | 9:49 PM
Share

Loksabha Election : महायुतीचा मुंबईतील जागांचा सस्पेंस अखेर संपला आहे. कारण आज मुंबईत शिंदे गटानं 2 उमेदवार जाहीर केले आहेत. शिवसेनेने यामिनी जाधव आणि रवींद्र वायकर यांना तिकीट दिले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या संजय निरुपम यांना उमेदवारी मिळालेली नाही.

शिवसेनेचे उमेदवार जाहीर

मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेनं आज दोन 2 उमेदवार जाहीर केल्यानंतर आता उत्तर पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकर विरुद्ध अमोल किर्तीकर तर दक्षिण मुंबईतून यामिनी जाधवा विरुद्ध अरविंद सावंत अशी लढत होणार आहे. काही दिवसांआधीच वायकर उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदेंकडे आले आहेत. महिन्याभराच्या आतच त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे.

संजय निरुपम यांचा पत्ता कट

विशेष म्हणजे वायकरांच्या उमेदवारीला मनसेनं उघड विरोध केला होता. भ्रष्टाचाऱ्याचा प्रचार आम्ही करायचा का ? असा सवाल मनसेच्या शालिनी ठाकरेंनी केला होता. आता वायकरांना तिकीट दिल्यानं शिंदेंच्या शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या संजय निरुपमांचाही पत्ता कट झाला आहे. काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर शिंदे गटात प्रवेश केला नसला तरी संजय निरुपम इच्छुक होते. मंत्री उदय सामंतांनीही त्यांची भेट घेतली होती.

दक्षिण मुंबईतून भाजपकडून राहुल नार्वेकर इच्छुक होते. त्यांनी प्रचारही सुरु केला होता. तसंच मंत्री मंगलप्रभात लोढांचंही नाव चर्चेत होतं. मात्र दक्षिण मुंबईची जागा स्वत:कडे ठेवण्यात शिंदेंना यश आलं आहे. आता मुंबईतल्या 6 पैकी 6 लढती निश्चित झाल्या आहेत.

  • दक्षिण मुंबईतून ठाकरे गटाचे विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्या विरोधात शिंदेंच्या शिवसेनेकडून यामिनी जाधव उमेदवार आहेत.
  • दक्षिण मध्य मुंबईतून ठाकरे गटाचे अनिल देसाई विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे अशी थेट लढत आहे.
  • उत्तर पश्चिम मुंबईतून ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकरांची लढत शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकरांशी होईल.
  • उत्तर मध्य मुंबईतून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विरुद्ध भाजपचे अॅड. उज्ज्वल निकम यांचा सामना होईल.
  • मुंबई उत्तर पूर्वमधून भाजपचे मिहीर कोटेचा विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय दिना पाटील यांच्यात सामना आहे.
  • उत्तर मुंबईतून भाजपनं केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसनं भुषण पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी