AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...

Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे…

| Updated on: Sep 23, 2026 | 6:27 PM
Share

शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात आजची सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. यूपीएससी संबंधित अन्य एका प्रकरणावर बराच वेळ युक्तिवाद झाल्याने हे प्रकरण सुनावणीसाठी आले नाही. लवकरच नवी तारीख जाहीर होण्याची शक्यता असून, पुढील आठवड्यापर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.

शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली नाही. काल दुपारी दोन वाजल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी घेण्याचे अपेक्षित होते, मात्र दुसऱ्या एका महत्त्वाच्या प्रकरणामुळे या सुनावणीला वेळ मिळाला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, आज एक यूपीएससी संबंधित मॅटर सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर दोन तास सुरू होते. त्यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्हाचे प्रकरण आज युक्तिवादासाठी आले नाही. सर्वोच्च न्यायालय लवकरच या प्रकरणासाठी नवीन तारीख देणार आहे.

पुढील उद्याही याच यूपीएससी प्रकरणावर सुनावणी होण्याची शक्यता असल्याने, शिवसेना प्रकरणाची सुनावणी उद्याही होईल की नाही याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता कमी असून, पक्षचिन्ह प्रकरणाच्या सुनावणीसाठी आता पुढच्या आठवड्याची वाट पाहावी लागू शकते. प्रमोद जगताप यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली.

Published on: Sep 23, 2026 06:27 PM

Follow Us