AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार

Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार

| Updated on: Sep 23, 2026 | 6:57 PM
Share

१५ ऑक्टोबरपासून ₹२००० वरील युपीआय व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक आणि अर्थ मंत्रालयाने बँकांना एटीएममध्ये पुरेशी रोख रक्कम उपलब्ध ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. सणासुदीचा हंगाम आणि नव्या शुल्कामुळे रोख रक्कम काढण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगावर बोलताना शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी संसदेबाबत केलेल्या रखेल या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठे वादळ निर्माण झाले आहे. राऊत यांनी म्हटले की, “पार्लमेंटमध्ये मुद्दा उचलून काय होते? पार्लमेंटही या लोकांची रखेल बनली आहे. ज्ञानेश कुमारसारखे लोक, अमित शाह आणि मोदीजी यांची पार्लमेंट रखेल बनली आहे.” हे विधान चुकीचे असले तरी ते वास्तव असल्याचे राऊत यांनी म्हटले. या परिस्थितीत राष्ट्रपतीने लक्ष घालावे, अशी मागणीही त्यांनी केली.

या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाचे नेते राम कदम यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. कदम यांनी म्हटले की, “संजय राऊत संसदेला रखेल म्हणतात. परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातून ही संसद उभी राहिली आहे. तुम्ही बाबासाहेबांचा अपमान करताय, त्या संविधानाचा अपमान करताय, याची जाणीव तुम्हाला नाही का?” जर संसद तुमच्या दृष्टिकोनातून रखेल असेल, तर आजच्या आज राजीनामा द्या, अशी मागणीही राम कदम यांनी संजय राऊत यांच्याकडे केली आहे. या वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Published on: Sep 23, 2026 06:57 PM

Follow Us