IPL 2024 LSG vs KKR Live Streaming : लखनऊ-केकेआरचा दुसऱ्यांदा आमनासामना, कोण ठरणार सरस?

Lucknow Super Giants vs Kolkata Knight Riders Live Streaming : लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात जोरदार चुरस पाहायला मिळणार आहे.

IPL 2024 LSG vs KKR Live Streaming : लखनऊ-केकेआरचा दुसऱ्यांदा आमनासामना, कोण ठरणार सरस?
shreyas iyer and k l rahul lsg vs kkr ipl 2024,Image Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: May 04, 2024 | 5:47 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमात रविवारी 5 मे रोजी डबल हेडरचा थरार रंगणार आहे. डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स असा सामना होणार आहे. तर या हंगामात लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स दुसऱ्यांदा भिडणार आहे. याआधी केकेआरने 14 एप्रिल रोजी लखनऊवर 8 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे लखनऊकडे पराभवाचा वचपा घेण्याची संधी आहे. दोन्ही संघात या रविवारच्या सामन्यात चांगलीच चढाओढ पाहायला मिळणार आहे. कारण दोन्ही संघ प्लेऑफसाठी प्रबळ दावेदार आहेत.

केकेआर आणि लखनऊ दोन्ही संघांचा हा या हंगामातील 11 वा सामना असणार आहे. केकेआरने 10 पैकी 7 सामने जिंकलेत. केकेआर 14 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. तर लखनऊने 10 मधून 6 वेळा यश मिळवलंय. लखनऊच्या नावे 12 गुण आहेत. लखनऊ पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे आता लखनऊ पराभवाचा वचपा घेण्याच्या हिशोबाने मैदानात उतरणार आहे. तर केकेआर लखनऊला पुन्हा धुळ चारत प्लेऑफच्या आणखी जवळ जाण्याच्या तयारीत असणार आहे.

लखनऊ विरुद्ध कोलकाता सामना केव्हा?

लखनऊ विरुद्ध कोलकाता सामना रविवारी 5 मे रोजी होणार आहे.

लखनऊ विरुद्ध कोलकाता सामना कुठे?

लखनऊ विरुद्ध कोलकाता सामना भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियम, लखनऊ येथे होणार आहे.

लखनऊ विरुद्ध कोलकाता सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

लखनऊ विरुद्ध कोलकाता सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस पार पडेल.

लखनऊ विरुद्ध कोलकाता सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

लखनऊ विरुद्ध कोलकाता सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

लखनऊ विरुद्ध कोलकाता सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?

लखनऊ विरुद्ध कोलकाता सामना मोबाईलवर जिओ सिनेमा एपद्वारे फुकटात पाहता येईल.

लखनऊ सुपर जायंट्स : केएल राहुल (कॅप्टन), युधवीर सिंग चरक, यश ठाकूर, मयंक यादव, मणिमारन सिद्धार्थ, शिवम मावी, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, शामर जोसेफ, डेव्हिड विली, मार्कस स्टॉइनिस, कृणाल पंड्या, कायल मेयर्स, प्रेरक मंकड, अर्शीन कुलकर्णी, दीपक हुड्डा, कृष्णप्पा गौथम, ॲश्टन टर्नर, निकोलस पूरन, देवदत्त पडिक्कल, क्विंटन डी कॉक, आयुष बडोनी, अमित मिश्रा, अर्शद खान आणि मोहसीन खान.

कोलकाता नाईट रायडर्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), श्रीकर भरत, मनीष पांडे, रहमानउल्ला गुरबाज, रमणदीप सिंग, नितीश राणा, शेरफेन रदरफोर्ड, रिंकू सिंग, व्यंकटेश अय्यर, सुनील नरीन, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, वैभव अरोरा, दुष्मंथा चमीरा, हर्षित राणा, मुजे राणा रहमान, चेतन साकारिया, मिचेल स्टार्क, सुयश शर्मा, वरुण चक्रवर्ती, साकिब हुसेन, अंगक्रिश रघुवंशी आणि फिलिप सॉल्ट.

Non Stop LIVE Update
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच
नेहरुंनतर मोदी तिसरे PM बनणार, राज यांची 'शिवतीर्था'वरून थेट घोषणाच.
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका
तेव्हापासून ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणं सोडल, फडणवीसांची टीका.
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी
त्यामुळे मला पाठींबा द्या, बिचूकले लोकसभेच्या रिंगणात, केली मोठी मागणी.
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू
बैठका अन सभांचा सपाटा सुरु असताना जरांगेंची प्रकृती बिघडली, उपचार सुरू.
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.