AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहरुख खानने सर्वांना मारली मिठी, पण हिजाबमधील तरुणीला पाहिल्यानंतर…, व्हिडीओ तुफान व्हायरल

Shah Rukh Khan | '... म्हणून तो SRK आहे...', सर्व महिला आणि पुरुष चाहत्यांना शाहरुख खान याने मारली मिठी, पण हिजाबमधील तरुणीला पाहिल्यानंतर किंग खानने काय केलं? व्हिडीओ तुफान व्हायरल, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त शाहरुख खान याची चर्चा...

शाहरुख खानने सर्वांना मारली मिठी, पण हिजाबमधील तरुणीला पाहिल्यानंतर..., व्हिडीओ तुफान व्हायरल
| Updated on: May 18, 2024 | 10:00 AM
Share

अभिनेता शाहरुख खान याला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. प्रत्येक पिढीतील व्यक्ती आज शाहरुख खान याची चाहती आहे. फक्त भारतातच नाहीतर, जगातील प्रत्येक कोपऱ्यात किंग खानच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांमध्ये कायम शाहरुख खान याची चर्चा रंगलेली असते. आता देखील किंग खान याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ जुना आहे. पण सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांच्या मनात शाहरुख खानबद्दल असलेलं प्रेम आणखी वाढलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त किंग खानच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

शाहरुख खानचा एक थ्रोबॅक व्हिडिओ इंस्टाग्रामवर incredible.srk नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये शाहरुख खान त्याच्या काही चाहत्यांना भेटताना दिसत आहे. प्रत्येकाला किंग खान प्रेमाने मिठी मारताना दिसत आहे. पण हिजाबमध्ये असलेल्या तरुणीला पाहाताच अभिनेता खाली वाकतो आणि आदाब करतो. अभिनेता महिलेचा आणि संस्कृतीचा आदर करताना दिसत आहे.

शाहरुख खान याने आदाब केल्यानंतर तरुणी देखील मान खाली करत अभिनेत्याला सलाम करते… व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सोशल मीडियावर शाहरुख खान याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आसतात. पण या व्हिडीओने चाहत्यांचं मन जिंकलं आहे.

सांगायचं झालं तर, व्हिडीओ आतापर्यंत 32 हजारपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘… म्हणून तो शाहरुख खान आहे.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘महिलांचा आदर कसा करावा हे शाहरुख खान याच्याकडून शिकायला हवं…’ अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘शाहरुख खान ऑट टाईम बेस्ट आहे….’ सोशल मीडियावर सध्या किंग खान याची चर्चा रंगली आहे.

शाहरुख खान याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता ‘किंग’ सिनेमामुळे चर्चेत आहे. ‘किंग’ सिनेमात शाहरुख खान लेक सुहाना खान हिच्यासोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात झाल्याची देखील माहिती मिळत आहे.

किंग याने गेल्या वर्षी देखील हीट सिनेमे बॉलिवूडला दिले. ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ सिनेमामुळे बॉक्स ऑफिसवर चाहत्यांची गर्दी जमली. तिन्ही सिनेमांनी फक्त भारतात नाही तर, परदेशात देखील नवीन विक्रम रचले. आता चाहते अभिनेत्याच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहे.

शाहरुख खान चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. आस्क एसआरके सेशनच्या माध्यमातून अभिनेता चाहत्यांच्या सर्वत्र प्रश्नांची उत्तरं देत असतो. सोशल मीडियावर देखील शाहरुख खान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

Follow Us
ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह? बुलढाणा असेल बालेकिल्ला अन् तब्बल...
ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह! बुलढाणा असेल बालेकिल्ला अन् तब्बल... शिवसेनेच्या कोर्टातील निकालाआधीच मोठा बॉम्ब
ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न
कल्याणमध्ये ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न
मुंडे भाऊ-बहिण पुन्हा चर्चेत; थेट म्हणाले, आमच्यातील वाद आता...
मुंडे भाऊ-बहिण पुन्हा चर्चेत; थेट म्हणाले, आमच्यातील वाद आता... बीडच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
पान मसाल्याच्या जाहिरातीवरून FDA ची तीन बॉलीवूड कलाकारांना नोटीस
पान मसाल्याच्या जाहिरातीवरून FDA ची तीन बॉलीवूड कलाकारांना नोटीस.
'प्रत्येक बहिणीला वाटते एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत'
'प्रत्येक बहिणीला वाटते एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत'-ज्योति वाघमारे
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुजय विखे आक्रमक
'ट्रम्प सारखा वेडा माणूस मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिला नाही'-सुजय विखे
१६ ऑगस्ट २०२६ च्या ठळक बातम्या: महिला आरक्षण, देशातील प्रमुख घडामोडी
१६ ऑगस्ट २०२६: महाराष्ट्रातील आणि देशातील प्रमुख घडामोडी
मुंबई लोकल: मध्य आणि हार्बर मार्गांवर आज मेगाब्लॉक
मुंबई लोकल: मध्य आणि हार्बर मार्गांवर आज मेगाब्लॉक, प्रवाशांना उशीर
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस