IPL च्या इतिहासात पहिल्यांदा संघमालकाने भर मैदानात कॅप्टनला झापलं, पाहा व्हिडीओ

आयपीएलमध्ये सामना हरल्यानंतर लखनऊ संघाचे मालक संजीव गोयंका कॅप्टन के.एल. राहुल याच्यावर संतापलले दिसले. सामना एकट्या राहुलमुळेच हरल्यासारखं त्यांचे हावभाव दिसले. सोशल मीडियावर ते ट्रोल झाले आहेत.

IPL च्या इतिहासात पहिल्यांदा संघमालकाने भर मैदानात कॅप्टनला झापलं, पाहा व्हिडीओ
LSG team Owner Sanjeev Goyanka KL Rahul Video
Follow us
| Updated on: May 09, 2024 | 8:35 PM

आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या सनराजर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना पार पाडला. या सामन्यामध्ये हैदराबाद संघाने लखनऊ संघावर दहा विकेट आणि 62 चेंडू राखून विजय मिळवला. लखनऊचा सलग दुसरा पराभव झाल्याने आता क्वालिफाय होण्याची वाट धूसर झालीये. सामना संपल्यानंतर लखनऊ संघाचे मालक संजीव गोयंका यांचा आणि के. एल. राहुलचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये संजी गोयंका हे के. एल. राहुल याच्यावर संतापले दिसत आहेत.

आयपीएलमध्ये एखाद्या संघाचा मालक आपल्या कॅप्टनला भर मैदानात झापण्याची पहिली वेळ असावी. के.एल. हा लहान किंवा नवखा खेळाडू नाही. टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारीसुद्धा त्याने पार पाडली आहे. सामना संपल्यावर एखाद्या लहान मुलाला ओरडल्यासारखे गोयंका राहुलवर ओरडत असल्याचं दिसलं. राहुलने नम्रपणा दाखवला त्यावेळी गोयंका यांना काहीही बोलला नाही. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

के. एल. राहुलच्या चाहत्यांनी गोयंका यांना फटकारलं आहे. सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जात आहे.  संघाचे मालक असले म्हणून काय झालं? खेळाडूसोबत वागण्याची एक पद्धत असते. आंतरराष्ट्रीय खेळाडूसोबत तुम्ही अशा प्रकारे नाही वागू शकत. आरसीबीच्या चाहत्यांनी तर के.एल. याला परत आरसीबीमध्ये येण्यासाठी आमंत्रित केलं आहे.

पाहा व्हिडीओ-

दरम्यान, बुधवारी झालेल्या सामन्यामध्ये लखनऊ संघाने प्रथम फलंदाजी करताना 165-4 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबाद संघाचे सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी अर्धशतकी खेळी करत सामना जिंकवला.

Non Stop LIVE Update
राऊतांचे बंधू सुनील मतदानकेंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमकं काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदानकेंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमकं काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.
तर खूप जड जाणार,जरांगेंचा मुंडे बंधू भगिनींवर गंभीर आरोप अन दिला इशारा
तर खूप जड जाणार,जरांगेंचा मुंडे बंधू भगिनींवर गंभीर आरोप अन दिला इशारा.
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी
युपीत प्रयागराजमध्ये राहुल गांधी, अखिलेश यादवांच्या सभेला तुफान गर्दी.
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.