RCB vs GT : गुजरातने करो या मरो सामन्यात टॉस गमावला, आरसीबीकडून बॅटिंगचं आमंत्रण

Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans Toss : आरसीबीने टॉस जिंकून पाहुण्या गुजरातला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. गुजरातसाठी हा करो या मरो सामना आहे.

RCB vs GT : गुजरातने करो या मरो सामन्यात टॉस गमावला, आरसीबीकडून बॅटिंगचं आमंत्रण
rcb vs gt toss ipl 2024,Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: May 04, 2024 | 7:51 PM

आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 52 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. शुबमन गिलकडे गुजरात टीमच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. तर फाफ डु प्लेसिस आरसीबीचं कर्णधारपद सांभाळणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. आरसीबीच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. फाफ डु प्लेसीसने बॉलिंगचा निर्णय घेत गुजरातला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.

गुजरातने या करो या मरो सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये 2 बदल केले आहेत. कॅप्टन शुबमन गिल याने टॉस दरम्यान ही माहिती दिली. मानव सुथार याने गुजरातसाठी पदार्पण केलंय. तर जोशुआ लिटील याचा प्लेईंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. तर आरसीबीने प्लेईंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. कॅप्टन फाफ डु प्लेसीस याने आपल्या त्याच 11 खेळाडूंवर विश्वास दाखवत टीम कायम ठेवली आहे. आता आरसीबीचे गोलंदाज गुजरातला किती धावांपर्यंत रोखण्यात यशस्वी ठरतात, याकडे लक्ष असणार आहे.

गुजरातला पराभवाचा वचपा घेण्याची संधी

दरम्यान दोन्ही संघ या हंगामात सलग दुसऱ्यांदा आमनेसामने आले आहेत. त्याआधी दोन्ही संघांमध्ये 28 एप्रिल रोजी सामना झाला होता. तेव्हा आरसीबीने गुजरातला त्यांच्याच घरच्या मैदानात पराभूत केलं होतं. त्यात आता गुजरातसाठी हा आरपारचा सामना आहे. त्यामुळे गुजरातकडे हा सामना जिंकून गेल्या पराभवाचा वचपा घेण्याची दुहेरी संधी आहे. आता यात गुजरात यशस्वी ठरणार की आरसीबी गेम बिघडवणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

आरसीबीने टॉस जिंकला, गुजरातची बॅटिंग

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, विल जॅक्स, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), कर्ण शर्मा, स्वप्नील सिंग, मोहम्मद सिराज, यश दयाल आणि विजयकुमार वैशाक.

गुजरात टायटन्स लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कर्णधार), ऋद्धीमान साहा, साई सुधारसन, डेव्हिड मिलर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, मानव सुथार, नूर अहमद, मोहित शर्मा आणि जोशुआ लिटल.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.