
आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 57 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचा विस्फोटक सलामीवीर फलंदाज ट्रेव्हिस हेड याने लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध विस्फोटक अर्धशतक ठोकलंय. हेडची बॅट या हंगामातील सुरुवातीच्या काही सामन्यातील झंझावातानंतर शांत झाली होती. मात्र हेडला पुन्हा सूर गवसला. हेडने लखनऊ विरुद्ध तोडफोड बॅटिंग करत अर्धशतक झळकावलं आणि 166 धावांचा पाठलाग करताना टीमला चांगली सुरुवात मिळवून दिली. ट्रेव्हिस हेडने सामन्यातील पाचव्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर सिक्स ठोकला. हेडने या सिक्ससह अवघ्या 16 बॉलमध्ये या हंगामात दुसऱ्यांदा अर्धशतक ठोकलं आणि स्वत:च्याच विक्रमाची बरोबरी केली. हेडच्या आयपीएल कारकीर्दीतील हे पाचवं अर्धशतक ठरलं. हेडने या अर्धशतकी खेळीत 312.50 च्या स्ट्राईक रेटने 5 सिक्स आणि 5 चौकार ठोकले.
दरम्यान सनरायजर्स हैदराबादच्या ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीने पावर प्लेमध्ये चाबूक बॅटिंग केली. या दोघांनी केलेल्या तडाखेदार बॅटिंगच्या जोरावर हैदराबादने पावर प्लेमध्येच शतक पूर्ण केलं. हैदराबादने विजयासाठी मिळालेल्या 166 धावांचा पाठलाग करताना 5.4 ओव्हरमध्येच 100 धावांचा पल्ला गाठला.
हेडने या हंगामातील सुरुवातीच्या सामन्यांमध्ये विस्फोटक बॅटिंग करुन गोलंदाजांना हैराण करुन सोडलं होतं. मात्र त्यानंतर हेड पुन्हा ट्रॅकवरुन घसरला. काही सामन्यात त्याला तुफानी बॅटिंग करता आली नाही. मात्र प्लेऑफच्या हिशोबाने अटीतटीच्या सामन्यात हेडला सूर गवसला. हेडने हैदराबादला अपेक्षित तशीच सुरुवात करुन दिली. आता हैदराबाद हे विजयासाठी मिळालेलं आव्हान किती ओव्हरमध्ये पूर्ण करतं,याकडे हैदराबादच्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
हैदराबादची कडक सुरुवात
Entertainment guaranteed with these two in the middle 😉
Exemplary striking from @SunRisers‘ opening duo as they reach 107/0 after 6 overs! 😮
Follow the match ▶️ https://t.co/46Rn0QwHfi#TATAIPL | #SRHvLSG pic.twitter.com/imRqEIqsAX
— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2024
लखनऊ सुपर जायंट्स प्लेइंग इलेव्हन : केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), क्विंटन डी कॉक, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, दीपक हुडा, कृणाल पंड्या, कृष्णप्पा गौथम, यश ठाकूर, रवी बिश्नोई आणि नवीन-उल-हक.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, सनवीर सिंग, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, विजयकांत व्यासकांत आणि टी नटराजन.