SRH vs CSK : नितीशची झंझावाती खेळी, हेन्रिक क्लासेनची कडक साथ, हेडचं अर्धशतक, राजस्थानला 202 धावांचं आव्हान

Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Highlights In Marathi : सनरायजर्स हैदराबादच्या फलंदाजांनी राजस्थानच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई करत 200 पार मजल मारली.

SRH vs CSK : नितीशची झंझावाती खेळी, हेन्रिक क्लासेनची कडक साथ, हेडचं अर्धशतक, राजस्थानला 202 धावांचं आव्हान
nitish reddy Heinrich Klaasen Travis HeadImage Credit source: BCCI/IPL
Follow us
| Updated on: May 02, 2024 | 9:54 PM

सनराजयर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 202 धावांचं आव्हान दिलं आहे. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 201 धावा केल्या. हैदराबादकडून नितीश रेड्डी या युवा फलंदाजांनी सर्वाधिक 76 धावांची नाबाद खेळी केली. तर विकेटकीपर बॅट्समन हेन्रिक क्लासेन याने 42 धावांचं योगदान दिलं. त्याआधी अनमोलप्रीतसिंह 5 धावा करुन माघारी परतला. तर अभिषेक शर्मा याने 12 धावा जोडल्या. तर आक्रमक आणि विस्फोटक ओपनर ट्रेव्हिस हेड याने 58 धावांची खेळी केली. राजस्थाकडून आर अश्विन याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

नितीश रेड्डी आणि हेन्रिक क्लासेन या जोडीने अखेरीस जोरदार फटकेबाजी करत हैदराबादला 200 पार पोहचवण्यात मोठी भूमिका बजावली. नितीशने 42 बॉलमध्ये 8 सिक्स आणि 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 76 धावा केल्या. तर क्लासेन 19 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 3 चौकारांसह 42 धावांवर नाबाद परतला. ट्रेव्हिस हेड याने 131.82 च्या स्ट्राईक रेटने 44 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 6 चौकारांच्या मदतीने 58 धावा जोडल्या. तर अभिषेक शर्मा याने 10 बॉलमध्ये 12 धावा केल्या. राजस्थानकडून आवेश खान व्यतिरिक्त संदीप शर्मा याने 1 विकेट घेतली.

राजस्थान मिळवणार प्लेऑफचं तिकीट?

दरम्यान राजस्थान रॉयलन्सचा हा आयपीएलच्या 17 व्या मोसमातील 10 वा सामना आहे. राजस्थानने या आधीच्या 9 पैकी 8 सामन्यात विजय मिळवला आहे. राजस्थान 16 गुणांसह पॉइंट्ससह अव्वल स्थानी आहे. राजस्थानने हैदराबाद विरुद्धचा सामना जिंकला तर ते प्लेऑफसाठी पात्र ठरतील. त्यामुळे आता राजस्थान यशस्वी ठरणार की हैदराबाद विजय मिळवून प्लेऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकणार, याकडे लक्ष असणार आहे.

राजस्थानसमोर 202 धावांचं आव्हान

राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन : संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र चहल आणि संदीप शर्मा.

सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंग, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जॅनसेन, भुवनेश्वर कुमार आणि टी नटराजन.

Non Stop LIVE Update
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.