IPL 2024 : प्लेऑफच्या दिशेने कोण करणार कूच? मुंबई इंडियन्स की दिल्ली कॅपिटल्स! जाणून घ्या समीकरण

| Updated on: Apr 26, 2024 | 3:13 PM

आयपीएल 2024 स्पर्धेत प्लेऑफची शर्यत रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे. प्रत्येक सामन्यानंतर प्लेऑफचं समीकरण बदलताना दिसत आहे. या स्पर्धेत अजूनही दहाही संघांना प्लेऑफची संधी आहे. त्यात दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होत आहे. चला जाणून घेऊयात या दोन संघांना किती संधी ते

IPL 2024 : प्लेऑफच्या दिशेने कोण करणार कूच? मुंबई इंडियन्स की दिल्ली कॅपिटल्स! जाणून घ्या समीकरण
Image Credit source: IPL/BCCI
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेतील 43वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात हे दोन्ही संघ भिडणार आहे. या स्पर्धेत मुंबई आणि दिल्ली दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहे. वानखेडेवर रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला 29 धावांनी पराभूत केलं होतं. मुंबई इंडियन्सने 20 षटकात 5 गडी गमवून 234 धावा केल्या होत्या. पण दिल्ली कॅपिटल्सचा संघ 205 धावा करून शकला आणि 29 धावांनी पराभव झाला. आता दिल्ली कॅपिटल्स मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी प्रत्येक सामन्यातील विजय महत्त्वाचा आहे. 16 गुण झाले की आरामात प्लेऑफमध्ये स्थान मिळणार हे गणित डोळ्यासमोर आहे. त्यामुळे किती संधी आहेत आणि कसं काय करायचं याचं गणित जुळवलं जातं आहे. प्रत्येक संघाला साखळी फेरीत 14 सामने खेळायचे आहेत. त्यापैकी काही सामने झाले असून उर्वरित सामन्यावर गणित अवलंबून आहे. चला जाणून घेऊयात दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सचं प्लेऑफचं गणित

दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या पदरात 8 गुण असून -0.386 नेट रनरेट आहे. दिल्लीने 14 पैकी 9 सामने खेळले आहेत. आता उर्वरित पाच सामन्यात 10 गुण कमवण्याची संधी आहे. म्हणजेच एकूण 18 गुण होतील. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला यापैकी एक सामना गमवला तरी काही फरक पडणार नाही. चार सामने जिंकून 16 गुणांसह प्लेऑफमध्ये स्थान मिळवता येईल. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला चार सामने जिंकायचे आहेत.

मुंबई इंडियन्सचं गणितही काही अंशी दिल्ली कॅपिटल्ससारखं आहे. पण मुंबई इंडियन्स आठव्या स्थानी असून 6 गुणांसह -0.227 नेट रनरेट आहे. मुंबई इंडियन्स आतापर्यंत 8 सामने खेळली असून फक्त 3 सामन्यात विजय मिळवला आहे. तर पाच सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे उर्वरित सहा सामन्यात 12 गुण मिळवून एकूण 18 गुण करण्याची संधी आहे. म्हणजेच सहा पैकी एका सामन्यात पराभव झाला तरी टेन्शन घ्यायचं कारण नाही. मुंबई इंडियन्सला सहा पैकी पाच सामन्यात काहीही करून विजय मिळवावा लागेल. जेणेकरून प्लेऑफमध्ये स्थान मिळेल.

दिल्ली कॅपिटल्सचे उर्वरित सामने मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यासोबत आहेत. तर मुंबई इंडियन्सचे उर्वरित सामने दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स (दोन सामने), कोलकाता नाईट रायडर्स (दोन सामने), सनरायझर्स हैदराबाद यांच्यासोबत आहेत.