
आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) आठव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. चेन्नईच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार ऋतुराज गायकवाड याने फिल्डिंगचा निर्णय घेत बंगळुरुला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केला आहे. दोन्ही संघांनी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी दिलीय? हे जाणून घेऊयात.
आरसीबीने रसीख दार सलाम याच्या जागी प्लेइंग ईलेव्हनमध्ये भुवनेश्वर कुमार याला संधी दिली आहे. तर सीएसकेने नॅथन एलीस याला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. नॅथन एलीस याच्या जागी मथीशा पाथीराना याला संधी दिली आहे. आता या दोघांपैकी कोणता गोलंदाज गेमचेंजर ठरतो? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
चेन्नई विरुद्ध आरसीबी हे दोन्ही संघ आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत एकूण 33 वेळा आमनेसामने आले आहेत. आकडेवारीनुसार चेन्नई आरसीबीवर वरचढ राहिली आहे. चेन्नईने 33 पैकी 21 सामन्यात आरसीबीचा धुव्वा उडवला आहे. तर आरसीबीने 11 सामन्यात विजय मिळवला आहे.
दरम्यान दोन्ही संघांचा हा या हंगामातील दुसरा सामना आहे. दोन्ही संघांनी या हंगामात विजयाने सुरुवात केली आहे.त्यामुळे आता दोन्ही संघांचा सलग दुसरा विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे आता या लढतीत कोण यशस्वी ठरणार? याकडे साऱ्यांचंच लक्ष असणार आहे.
दोन्ही टीमची प्लेइंग ईलेव्हन
#CSK skipper #RuturajGaikwad wins the toss and Chennai will field first! 💛💪🏻
With both teams making one change, who do you think will triumph in this clash of legends? 👀
Watch LIVE action ➡ https://t.co/MOqwTBlt43#IPLonJioStar 👉 #CSKvRCB | LIVE NOW on Star Sports 1, Star… pic.twitter.com/ph7uhnmoit
— Star Sports (@StarSportsIndia) March 28, 2025
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग इलेव्हन : विराट कोहली, फिलिप सॉल्ट, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड आणि यश दयाल.
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : रचीन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, सॅम कुरन, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, मथीशा पाथीराना आणि खलील अहमद.