
आयपीएलच्या 18 व्या मोसामातील साखळी फेरीचा थरार संपला आहे. आता प्लेऑफ सामन्यांचा थरार पाहायला मिळत आहे. पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांनी टॉप 2 मध्ये स्थान मिळवलं. तर दुसऱ्या बाजूला गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्सला तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी समाधान मानावं लागलं. त्यामुळे गुजरात आणि मुंबईला अंतिम फेरीत पोहचण्यासाठी 2 सामने जिंकावे लागणार आहेत. गुजरात विरुद्ध मुंबई यांच्यात त्याआधी एलिमिनेटर सामना होणार आहे. दोन्ही संघांसाठी हा आरपारचा आणि अटीतटीचा असा सामना आहे. विजयी संघ स्पर्धेतील आव्हान कायम राखेल. तर पराभूत संघांचं आव्हान इथेच संपुष्ठात येईल. त्यामुळे या एलिमिनेटर सामन्याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
मुंबई विरुद्ध गुजरात दोन्ही संघांची या मोसमात आमनेसामने येण्याची ही तिसरी वेळ ठरणार आहे. याआधी दोन्ही संघ साखळी फेरीत 2 वेळा आमनेसामने आले होते. तेव्हा दोन्ही सामन्यांमध्ये गुजरातने मुंबईवर विजय मिळवला होता. गुजरातने मुंबईवर 29 मार्च रोजी 36 धावांनी विजय मिळवला होता. तर गुजरातने 6 मे रोजी चित्तथरारक झालेल्या सामन्यात मुंबईवर मात केली होती. त्यामुळे मुंबई एलिमिनेटरमध्ये विजय मिळवून 2 पराभवांची परतफेड करत हिशोब बरोबर करणार की गुजरात पलटण विरुद्ध विजयी हॅटट्रिक करणार? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स शुक्रवारी 30 मे रोजी होणार आहे.
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना महाराजा यादवेंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, मुल्लानपूर चंडीगढ येथे होणार आहे.
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स लाईव्ह सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर पाहायला मिळेल.
दरम्यान गुजरातने साखळी फेरीतील 14 पैकी 9 सामने जिंकले. मात्र त्यानंतरही गुजरातला टॉप 2 मध्ये स्वत:ला कायम राखता आलं नाही. तर दुसऱ्या बाजूला मुंबईने 8 विजयांसह प्लेऑफचं तिकीट मिळवलं.