
पंजाब किंग्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 34 व्या सामन्यात होम टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर घरच्या मैदानात 5 विकेट्सने मात केली आहे. आरसीबीने पंजाबला विजयासाठी 14 ओव्हरमध्ये 96 धावांचं आव्हान दिलं होतं. पंजाबने हे आव्हान 12.1 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. पंजाबने 98 धावा केल्या. उभयसंघात 14 षटकांचा सामना खेळवण्यात आला. पावसामुळे सव्वा 2 तासांचा खेळ वाया गेल्याने 6-6 ओव्हर कापण्यात आल्या. तसेच पंजाबचा हा या मोसमातील पाचवा विजय ठरला. पंजाब या मोसमात 5 सामने जिंकणारी दिल्लीनंतर दुसरी टीम ठरली.
पाऊस आणि ओल्या खेळपट्टीमुळे सामन्याला 9 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात झाली. त्याआधी 9 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. पंजाबने आरसीबीला बॅटिंगसाठी भाग पाडलं.आरसीबीची पंजाबच्या गोलंदाजांसमोर घसरगुंडी झाली. त्यामुळे आरसीबी 50 धावा करणार की नाही? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. मात्र टीम डेव्हिड याने अखेरच्या क्षणी स्फोटक अर्धशतकी खेळी केली आणि आरसीबीची लाज राखली. टीम डेव्हीड याने अर्धशतक केलं. त्यामुळे आरसीबीला 14 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 95 धावा करता आल्या.
टीम डेव्हीडने 26 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 5 फोरसह नॉट आऊट 50 रन्स केल्या. कर्णधार रजत पाटीदार याने 23 धावांचं योगदान दिलं. तर या दोघांव्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. विराट कोहलीसह इतर फलंदाजांनी पंजाबच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. पंजाबकडून अर्शदीप सिंह, मार्को यान्सेन, युझवेंद्र चहल आणि हरप्रीत ब्रार या चौघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर झेव्हीयर बार्टलेट याने 1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.
पंजाब विजयी मात्र टीम डेव्हीड POTM
For his fighting knock and presence on the field, Tim David wins the Player of the Match award 🏆
Scorecard ▶ https://t.co/7fIn60rqKZ #TATAIPL | #RCBvPBKS pic.twitter.com/EqESYT6x6E
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2025
पंजाबने प्रत्युत्तरात 11 चेंडूंआधी विजयी आव्हान पूर्ण केलं. पंजाबकडून नेहल वढेरा याने सर्वाधिक धावा केल्या. नेहलने 3 सिक्स आणि 3 फोरसह नॉट आऊट 33 रन्स केल्या आणि पंजाबला विजयी केलं. तर मार्कस स्टोयनिस याने 2 बॉलमध्ये नॉट आऊट 7 रन्स केल्या. त्य़ाआधी प्रियांश आर्या याने 16 धावांचं योगदान दिलं. प्रभसिमर सिंह याने 13 धावा जोडल्या. जोस इंग्लिस याने 14 धावांची खेळी केली. कर्णधार श्रेयस अय्यर याने 7 रन्स केल्या. तर शशांक सिंह 1 रन करुन तंबूत परतला. आरसीबीकडून जोश हेझलवूड याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तर भुवनेश्वर कुमार याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.