
आयपीएलच्या 18 व्या मोसमाची 22 मार्चपासून ‘ओपनिंग’ होत आहे. या हंगामातील पहिला सामना हा कोलकाता विरुद्ध बंगळुरु यांच्यात होणार आहे. काही खेळाडू हे दुखापतीमुळे या संपूर्ण हंगामातून बाहेर झाले आहेत. या दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जागी दुसऱ्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. एकूण 4 खेळाडूंना दुखापतीमुळे या 18 व्या मोसमाला मुकावं लागलं आहे. दुखापतग्रस्त खेळाडूंमध्ये उमरान मलिक, ब्रायडन कार्स, अल्लाह गजनफर आणि लिझाड विलियम्स यांचा समावेश आहे. तर चेतन साकरिया, वियाम मल्डर, मुजीब उर रहमान आणि कॉर्बिन बॉश यांना दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जागी संधी देण्यात आली आहे. आयपीएल स्पर्धेत इमपॅक्ट प्लेअरप्रमाणे खेळाडूंच्या रिप्लेसमेंटबाबत काही नियम आहेत. IPL 2025 मध्ये रिप्लेसमेंटबाबत नियम काय? आयपीएलच्या आगामी हंगामासाठी खेळाडू बदलण्याच्या नियमात काय बदल झालाय? तसेच बीसीसीआयकडून काय सवलत देण्यात आली आहे? याबाबत सविस्तर जाणून घेऊयात. ...