IPL 2025 : रोहित की हार्दिक? मुंबईचा कर्णधार कोण? जाणून घ्या

Mumbai Indians IPL 2025 Captain : आयपीएलच्या 18 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर झालंय. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना हा 23 मार्चला असणार आहे. पलटणचं या हंगामात नेतृत्व कोण करणार? जाणून घ्या.

IPL 2025 : रोहित की हार्दिक? मुंबईचा कर्णधार कोण? जाणून घ्या
rohit bumrah hardik surya and tilak mi ipl 2025
Image Credit source: MI X Account
| Updated on: Feb 16, 2025 | 9:38 PM

बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने रविवारी 17 फेब्रुवारीला बहुप्रतिक्षित आयपीएलच्या 18 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीरक केलं. यंदाच्या हंगामात एकूण 10 संघांमध्ये 13 ठिकाणी 65 दिवस 74 सामन्यांचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेतील सलामीचा सामना हा 22 मार्चला कोलकाता विरुद्ध बंगळुरु यांच्यात खेळवण्यात येणार आहे. तर आयपीएलमधील सर्वात पहिला यशस्वी संघ मुंबईचा पहिला सामना हा 23 मार्चला होणार आहे. मुंबईसमोर पहिल्याच सामन्यात चेन्नईचं आव्हान असणार आहे. आयपीएलच्या 17 व्या मोसमाआधी नियमित कर्णधार रोहित शर्मा याला हटवून हार्दिक पंड्या याला कॅप्टन करण्यात आलं होतं. आता या हंगामात मुंबईचा कर्णधार कोण आहे? हे जाणून घेऊयात.

पलटणचा कॅप्टन कोण?

ऑलराउंडर हार्दिक पंड्या हाच मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार आहे. रोहित शर्मा याने त्याच्या नेतृत्वात मुंबईला 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली. मात्र मुंबईला 2020 नंतर एकदाही आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरता आलेलं नाही. तसेच गेल्या हंगामात हार्दिकची मुंबईचं नेतृत्व करण्याची पहिलीच वेळ होती. मात्र हार्दिकला कॅप्टन झाल्यानंतर पहिल्या हंगामात काही खास करता आलं नव्हतं. तसेच रोहितला हटवून हार्दिकला कॅप्टन करण्यात आल्याने नेटकऱ्यांनी आणि स्टेडियममध्ये प्रत्येक सामन्यात चाहत्यांनी ऑलराउंडरवर टीका केली होती. त्याचाही परिणाम हार्दिकच्या कामगिरीवर झाला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

मुंबईची 17 व्या हंगामातील कामगिरी

मुंबईची 17 व्या हंगामात निराशाजनक कामगिरी राहिली होती. मुंबईला 14 पैकी फक्त नि फक्त 4 सानेच जिंकता आले होते. तर 10 सामन्यात पराभूत व्हाव लागलं. मुंबई पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात शेवटी 10 व्या स्थानी राहिली. त्यामुळे यंदाच्या हंगामात कॅप्टन हार्दिकसमोर मुंबईला गतवैभव मिळवून देण्याचं आव्हान असणार आहे. आता हार्दिक या आव्हानाचा कसा सामना करतो? हे लवकरच स्पष्ट होईल.

आयपीएल 2025 साठी मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कर्णधार), जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, तिलक वर्मा, ट्रेन्ट बोल्ट, दीपक चाहर, विल जॅक्स, नमन धीर, मुजीब उर रहमान, (दुखापतग्रस्त अल्लाह गजनफर याच्या जागी समावेश), मिचेल सँटनर, रायन रिकल्टन, लिज्जाड विलियम्स, रीस टॉप्ली, रॉबिन मिंझ, कर्ण शर्मा, विग्नेश पुथुर, अर्जुन तेंडुलकर, बेवन जॅकब्स, वी सत्यनारायण, राज अंगद बावा, केएल श्रीजीत आणि अश्वनी कुमार.