AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : आयुष म्हात्रे दुखापतीमुळे स्पर्धेतून आऊट? दुखापतीतबाबत अशी अपडेट

Michael Hussey On Ayush Mhatre Injury: आयपीएलच्या 19 व्या मोसमात आतापर्यंत अनेक खेळाडूंना दुखापत झालीय. त्यात आयुष म्हात्रे याचंही नाव आहे. दुखापत पाहता परिस्थिती गंभीर असल्याचे संकेत सीएसकेचे बॅटिंग कोच मायकल हसी यांनी दिले आहेत.

IPL 2026 : आयुष म्हात्रे दुखापतीमुळे स्पर्धेतून आऊट? दुखापतीतबाबत अशी अपडेट
Csk Ayush Mhatre InjuryImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 19, 2026 | 6:21 PM
Share

एकूण 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सला आतापर्यंत 19 व्या मोसमात (IPL 2026) काही खास करता आलेलं नाही. सीएसकेला आतापर्यंत खेळलेल्या 6 पैकी 2 सामन्यांतच विजय मिळवता आलाय. त्यामुळे टीम मॅनेजमेंटकडून चिंता व्यक्त केली जात आहे. चेन्नईचा प्रमुख आणि अनुभवी फलंदाज महेंद्रसिंह धोनी याला दुखापतीमुळे आधीच 6 सामन्यांना मुकावं लागलं आहे. धोनीचं लवकरात लवकर कमबॅक अपेक्षित आहे. अशात चेन्नईला मोठा झटका देणारी बातमी समोर आली आहे. चेन्नईचा युवा फलंदाज आयुष म्हात्रे याला दुखापतीमुळे संपूर्ण 19 व्या मोसमातून बाहेर व्हावं लागणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सीएसकेचे बॅटिंग कोच माईक हसी यांनी आयुषच्या दुखापतीबाबत काय माहिती दिली हे जाणून घेऊयात.

आयुषला कधी आणि काय दुखापत झाली?

आयुषला हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात दुखापत झाली. आयुषला पाचव्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर दुखापत झाली. आयुषला दुसरी धाव घेताना हॅमस्ट्रिंगचा त्रास झाला. आयुष कसाबसा धावत नॉन स्ट्राईकला (बॉलर बॉलिंग टाकतो ती बाजू) पोहचला. त्यानंतर आयुष जागेवर बसला. आयुषची स्थिती पाहून फिजीओ मैदानात आले आणि त्याला काय झालंय हे पाहिलं. आयुषने पुन्हा बॅटिंगला सुरुवात केली. मात्र आयुष अवघ्या काही चेंडूंनंतर आऊट झाला. आयुषला या दुखापतीमुळे हालचाल करणं अवघड झालं. आयुषला आऊट झाल्यानंतर रामाकृष्ण घोष आणि फिजिओ टीमने मैदानाबाहेर नेलं.

“आयुषला हॅमस्ट्रिंग दुखापत झालीय. मात्र आयुषला झालेली दुखापत गंभीर आहे की नाही? याबाबत आता काही सांगता येणार नाही. आयुषला झालेल्या दुखापतीचं निदान करण्यासाठी स्कॅन करण्यात येईल”, अशी माहिती सीएसके बॅटिंग कोच माईक हसी यांनी दिली.

“मी ठामपणे सांगू शकत नाही. मात्र आयुषला झालेली दुखापत पाहून परिस्थिती योग्य नाही. आयुष सातत्याने चमकदार कामगिरी करत असताना त्याला झालेली दुखापत ही टीमसाठी चिंताजनक आहे”, अशी भीतीही हसीने बोलून दाखवली.

आयुषच्या 19 व्या मोसमात किती धावा?

दरम्यान आयुष म्हात्रे चेन्नईकडून 19 व्या मोसमात एकूण 6 सामने खेळला आहे. आयुषने या 6 सामन्यांत 201 धावा केल्या आहेत. आयुषने या दरम्यान 2 अर्धशतक झळकावलं. तसेच आयुषने 20 चौकार आणि 12 षटकारही लगावले आहेत. आयुषच्या दुखापतीबाबत हसीने चिंता व्यक्त करत त्याला काही सामन्यांला मुकावं लागणार असल्याचं संकेत दिलेत. त्यामुळे आयुषबाबत पुढील अपडेटकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!