AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CSK vs PBKS Toss : सीएसकेच्या होम ग्राउंडमध्ये पंजाबची बॉलिंग, यलो आर्मीकडून प्रशांत वीरचं पदार्पण, कुणाला डच्चू?

Chennai Super Kings vs Punjab Kings Toss : चेन्नई सुपर किंग्सची 19 व्या मोसमात पराभवाने सुरुवात झालीय. त्यामुळे चेन्नईचा पंजाबला पराभूत करुन घरच्या मैदानात विजयाचं खातं उघडण्याचा प्रयत्न असणार आहे.

CSK vs PBKS Toss : सीएसकेच्या होम ग्राउंडमध्ये पंजाबची बॉलिंग, यलो आर्मीकडून प्रशांत वीरचं पदार्पण, कुणाला डच्चू?
Ruturaj Gaikawad and Shreyas Iyer CSK vs PBKS Ipl TossImage Credit source: IPL X Account
| Updated on: Apr 03, 2026 | 7:54 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील सातव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचा हा या हंगामातील दुसरा सामना आहे. पंजाबने आपल्या मोहिमेची विजयाने सुरुवात केली आहे. तर यलो आर्मी आपला पहिला सामना जिंकण्यात अपयशी ठरली. त्यानंतर आता सीएसके विरुद्ध पीबीकेएस यांच्यातील सामना हा चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे होम टीम पंजाबसमोर किती धावांचं आव्हान ठेवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

चेन्नईकडून 1 बदल, पंजाबचं काय?

चेन्नईने पहिल्या सामन्यातील पराभानंतर प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केला आहे. यलो आर्मीने मॅथ्यू शॉट याचा पत्ता कट केला आहे. मॅथ्यूला सलामीच्या सामन्यात काही खास करता आलं नव्हतं. मॅथ्यूच्या जागी प्लेइंग ईलेव्हनमध्ये ऑलराउंडर प्रशांत वीर याचा समावेश करण्यात आला आहे. यासह प्रशांत वीर याचं पदार्पण झालं. तर पंजाबने त्याच प्लेइंग ईलेव्हनसह खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

चेन्नईसमोर पंजाबला सलग दुसरा सामना जिंकण्यापासून रोखण्याचं आव्हान

पंजाबने 31 मार्चला गुजरात टायटन्सचा पराभव करुन मोहिमेची विजयाने सुरुवात केली. तर दुसर्‍या बाजूला चेन्नईला राजस्थानकडून तब्बल 8 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे सीएसकेसमोर आता घरच्या मैदानात विजय मिळवण्याचं आव्हान असणार आहे. तर पंजाबचा सलग आणि एकूण दुसरा सामना जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी पोहचण्याचा प्रयत्न असणार आहे. आता या प्रयत्नात कोणला यश मिळतं हे सामन्यानंतरच स्पष्ट होईल.

पंजाब किंग्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कॅप्टन), प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), कूपर कोनोली, शशांक सिंग, नेहल वढेरा, मार्कस स्टॉयनिस, मार्को यान्सेन, झेव्हीयर बार्टलेट, विजयकुमार वैशाख, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.

चेन्नई सुपर किंग्स प्लेइंग ईलेव्हन : संजू सॅमसन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), आयुष म्हात्रे, सर्फराज खान, शिवम दुबे, कार्तिक शर्मा, प्रशांत वीर, नूर अहमद, अंशुल कंबोज, मॅट हेन्री आणि खलील अहमद.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल