AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026, CSK vs PBKS : चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स हेड टू हेड रेकॉर्ड काय? कोणाचं पारडं जड?

आयपीएल 2026 स्पर्धेतील सातवा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होत आहे. पंजाब किंग्सने पहिल्या सामन्यात विजय, तर चेन्नई सुपर किंग्सच्या पहिल्या सामन्यात पराभव झाला आहे. त्यामुळे चेन्नईला विजयी ट्रॅकवर येण्यासाठी विजय खूपच महत्त्वाचा आहे. चला जाणून घेऊयात हेड टू हेड रेकॉर्ड

IPL 2026, CSK vs PBKS : चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स हेड टू हेड रेकॉर्ड काय? कोणाचं पारडं जड?
IPL 2026, CSK vs PBKS : चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स हेड टू हेड रेकॉर्ड काय? कोणाचं पारडं जड?Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 02, 2026 | 10:57 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धा आता प्रत्येक सामन्यानंतर पुढे सरकत आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक संघाने प्रत्येकी एक सामना खेळला आहे. त्यात काही संघांनी विजय मिळवला आहे. तर काही संघांच्या पदरी निराशा पडली आहे. त्यामुळे दुसऱ्या फेरीत गाडी विजयाच्या रूळावर आणण्यासाठी प्रयत्न असणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील सातवा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होत आहे. चेन्नई सुपर किंग्सचा पहिल्या सामन्यात दारूण पराभव झाला होता. राजस्थान रॉयल्सने पराभवाची धूळ चारली होती. तर पंजाब किंग्सने गुजरात टायटन्सवर रडत रखडत विजय मिळवला होता. तसं पाहिलं तर दोन्ही संघ विजयासाठी आतुर असतील. पण चेन्नई सुपर किंग्सच्या होमग्राउंडवर हा सामना होत आहे. त्यामुळे पहिल्या विजयासाठी चेन्नईचा संघ आतुर असेल. हा सामना 3 एप्रिल 2026 रोजी एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे होत आहे. चला जाणून घेऊयात चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील हेड टू हेड आकडेवारी..

चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स हेड टू हेड रेकॉर्ड

चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल स्पर्धेत पाच वेळा जेतेपद मिळवलं आहे. तर पंजाब किंग्सने दोन वेळा अंतिम फेरी गाठली. पण दोन्ही वेळेस पदरी निराशा पडली. दोन्ही संघ स्पर्धेच्या पहिल्या पर्वापासून खेळत आहे. आतापर्यंत दोन्ही संघ 32 वेळा आमनेसामने आले आहे. पण दोन्ही संघात तूल्यबळ सामना झाला आहे. कारण चेन्नई सुपर किंग्सने 16 आणि पंजाब किंग्सने 16  सामने जिंकले आहेत.  त्यामुळे या सामन्यात विजय कोण मिळणार याची उत्सुकता आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात दोन्ही पहिल्यांदा 19 एप्रिल 2008 रोजी भिडले होते. तेव्हा चेन्नईने बाजी मारली होती. शेवटचा सामना 30 एप्रिल 2025 रोजी झाला होता. हा सामना पंजाबने जिंकला होता.चेन्नई सुपर किंग्सचा पंजाब किंग्सविरुद्ध सर्वाधिक धावांबाबत बोलायचं तर हा आकडा 240 चा आहे. तर पंजाब किंग्सने चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 231 धावा केल्या आहेत.

नाणेफेकीचा कौल आणि रेकॉर्ड

चेन्नई सुपर किंग्सने 19 वेळा, तर पंजाब किंग्सने 13 वेळा नाणेफेकीचा कौल जिंकला. पंजाबने नाणेफेक जिंकल्यानंतर 5 वेळी फलंदाजी, तर 8 वेळी गोलंदाजी निवडली. चेन्नई सुपर किंग्सने 8 वेळा फलंदाजी आणि 11 वेळा गोलंदाजी निवडली आहे. नाणेफेक जिंकत चेन्नईने 11 वेळा, तर पंजाबने 8 वेळा सामना जिंकला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारल्यानंतर चेन्नईने 6 वेळा, तर पांजाबने 2 सामने जिंकले. तर गोलंदाजी स्वीकारल्यानंतर 5 वेळा चेन्नईने, तर 6 वेळा पंजाबने सामना जिंकला आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा