AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DC vs MI : समीर रिझवीची चाबूक खेळी, दिल्लीचा सलग दुसरा विजय, मुंबईचा 6 विकेट्सने धुव्वा

Delhi Capitals vs Mumbai Indians Match Result IPL 2026 : समीर रिझवी याने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून दिल्ली कॅपिट्ल्सला सलग दुसरा सामना जिंकून दिला आहे. समीरने अरुण जेटली स्टेडियममध्ये मुंबई विरुद्ध 90 धावांचं योगदान दिलं.

DC vs MI : समीर रिझवीची चाबूक खेळी, दिल्लीचा सलग दुसरा विजय, मुंबईचा 6 विकेट्सने धुव्वा
Sameer Rizvi DC vs MI IPL 2026Image Credit source: IPL X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 04, 2026 | 8:03 PM
Share

इम्पॅक्ट प्लेअर समीर रिझवी याने सलग दुसरं अर्धशतक ठोकून दिल्ली कॅपिट्ल्सला विजयी केलं आहे. आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) आठव्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने होते. दिल्लीने अरुण जेटली स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सवर एकतर्फी विजय मिळवला. मुंबईने कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीसमोर 163 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दिल्लीने हे आव्हान 4 विकेट्सच्या मोबदल्यात आणि 11 बॉलआधी पूर्ण केलं. दिल्लीने 18.1 ओव्हरमध्ये 6 विकेट्स राखून 164 धावा केल्या. दिल्लीचा हा घरच्या मैदानातील पहिला आणि या मोसमातील सलग दुसरा विजय ठरला. समीर रिझवी हा या विजयाचा शिल्पकार ठरला. समीरने सर्वाधिक धावा केल्या. तसेच पाथुम निसांका यानेही योगदान दिलं.

दिल्लीने टॉस जिंकला, मुंबईची बॅटिंग

दिल्लीच्या बाजूने निर्णायक अशा नाणेफेकीचा कौल लागला. अक्षर पटेल याने मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. हार्दिक पंड्या याची तब्येत बरी नसल्याने सूर्यकुमार यादव याला नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली. सूर्यानेच मुंबईसाठी सर्वाधिक धावा केल्या. तसेच हिटमॅन रोहित शर्मा यानेही निर्णायक खेळी केली.

सूर्याने 36 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 3 फोरसह 51 रन्स केल्या. रोहितने 26 चेंडूत 35 धावांचं योगदान दिलं. नमन धीर याने 28, मिचेल सँटनर याने 18 तर कॉर्बिन बॉश याने 11 रन्स जोडल्या. मुंबईने अशाप्रकारे 6 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 162 धावांपर्यंत मजल मारली. दिल्लीसाठी मुकेश कुमार याने 2 विकेट्स मिळवल्या. तर इतर चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

मुंबईची जबरदस्त सुरुवात

मुंबईने 163 धावांचा पाठलाग करणाऱ्या दिल्लीला पहिल्या 2 ओव्हरमध्ये 2 झटके दिले. दीपक चाहर याने केएल राहुल याला पहिल्याच ओव्हरमध्ये विकेटकीपर रायन रिकेल्टन याच्या हाती कॅच आऊट केलं. केएल 1 रन करुन आऊट झाला. तर बुमराहने दिल्लीच्या डावातील दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याच बॉलिंगवर नितीश राणा याला झिरोवर रन आऊट केलं. त्यामुळे दिल्लीची 2 आऊट 7 अशी स्थिती झाली.

त्यानंतर पाथुम निसांका, समीर रिझवी आणि डेव्हिड मिलर या तिघांनी दिल्लीला विजयी करण्यात योगदान दिलं. पाथमुने 30 बॉलमध्ये 44 रन्स केल्या. पाथुमने या खेळीत 1 षटकार आणि 6 चौकार लगावले. समीर रिझवी याने 51 चेंडूत 176.47 च्या स्ट्राईक रेटने 90 रन्स केल्या. समीरने या खेळीत 7 षटकार आणि 7 चौकार लगावले. समीरची या मोसमात सलग आणि एकूण 50 पेक्षा अधिक धावा करण्याची दुसरी वेळ ठरली.

लाईव्ह स्कोअरकार्ड

तर डेव्हिड मिलर आणि ट्रिस्टन स्टब्स या दोघांनी उर्वरित धावा करुन दिल्लीला विजयापर्यंत पोहचवलं. मिलरने नाबाद 21 धावा केल्या. तर स्टब्सने नॉट आऊट 3 रन्स केल्या. मुंबईसाठी दीपक चाहर, मिचेल सँटनर आणि कॉर्बिन बॉश या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा