AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DC vs GT : दिल्लीने टॉस जिंकला, मॅचविनर समीर रिझवीला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी नाहीच

Delhi Capitals vs Gujarat Titans Toss and Playing 11 : गुजरात टायटन्सला 19 व्या मोसमात विजयाचं खातं उघडता आलेलं नाही. त्यामुळे गुजरात दिल्ली विरुद्ध ही प्रतिक्षा संपवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

DC vs GT : दिल्लीने टॉस जिंकला, मॅचविनर समीर रिझवीला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी नाहीच
Axar Patel and Shubman Gill DC vs GT Toss IPL 2026Image Credit source: Bcci
| Updated on: Apr 08, 2026 | 8:12 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 14 व्या सामन्यात यजमान दिल्ली कॅपिटल्स सलग आणि एकूण तिसऱ्या विजयासाठी सज्ज झाली आहे. या मोसमात आतापर्यंत राजस्थान रॉयल्स सलग आणि पहिले 3 सामने जिंकणारी एकमेव टीम आहे. त्यामुळे दिल्लीचा राजस्थानची बरोबरी करण्याचा प्रयत्न असणार आहे. राजस्थान 8 एप्रिलला घरच्या मैदानात अरुण जेटली स्टेडियममध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध भिडणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. दिल्लीच्या बाजूने टॉसचा कॉल लागला. कॅप्टन अक्षर पटेल याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. अशात गुजरात किती धावा करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कॅप्टन शुबमन गिल याचं कमबॅक

दिल्ली विरूद्धच्या सामन्यातून गुजरात टीमचा नियमित कॅप्टन शुबमन गिल याचं कमबॅक झालं आहे. शुबमनच्या कमबॅकमुळे कुमार कुशाग्र याला बाहेर व्हावं लागलंय. शुबमनला दुखापतीमुळे राजस्थान विरूद्धच्या सामन्याला मुकावं लागलेलं. त्यामुळे शुबमनच्या अनुपस्थितीत राशीद खान याने गुजरातच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली होती. मात्र आता शुबमनचं कमबॅक झालंय. त्यामुळे शुबमन गुजरातला तिसऱ्या सामन्यात पहिला विजय मिळवून देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

समीर रिझवी इम्पॅक्ट प्लेअर

दिल्ली कॅपिट्ल्सने सलग तिसऱ्या सामन्यातही मॅचविनर समीर रिझवी याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी दिलेली नाही. समीर तिसऱ्या सामन्यातही इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार आहे. समीरने दिल्लीसाठी गेल्या दोन्ही सामन्यांत अर्धशतकी खेळी करुन विजयात प्रमुख भूमिका बजावली आहे. त्यामुळे समीरला इम्पॅक्ट प्लेअर म्हणूनच खेळवण्यात येणार आहे.

दिल्ली पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानी?

दरम्यान ताज्या आकडेवारीनुसार, दिल्ली कॅपिट्ल्स पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी विराजमान आहे. दिल्लीच्या खात्यात 2 सामन्यांनंतर 4 गुण आहेत. दिल्लीचा नेट रनरेट हा +1.170 असा आहे. तर गुजरात सलग 2 पराभवानंतर पॉइंट्स टेबलमध्ये शेवटून दुसऱ्या अर्थात नवव्या क्रमांकावर आहे. गुजरातचा नेट रनरेट हा 0.424 असा आहे. त्यामुळे गुजरात दिल्लीवर मात करुन विजयाचं खातं उघडण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

गुजरात टायटन्स प्लेइंग ईलेव्हन : शुबमन गिल (कॅप्टन), साई सुदर्शन, जोस बटलर (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, शाहरुख खान, राहुल तेवतिया, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज आणि अशोक शर्मा.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन : केएल राहुल (विकेटकीपर), पथुम निसांका, नितीश राणा, विपराज निगम, अक्षर पटेल (कॅप्टन), डेव्हीड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, कुलदीप यादव, लुंगी एन्गिडी, टी नटराजन आणि मुकेश कुमार.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...