AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DC vs RR : ध्रुव-रियानचा अर्धशतकी तडाखा, दिल्लीसमोर 194 रन्सचं टार्गेट, राजस्थान जिंकणार?

Delhi Capitals vs Rajasthan Royals 1st Inning, IPL 2026 : टॉप ऑर्डरमधील फलंदाजांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध 190 धावांच्या पार मजल मारली आहे. त्यामुळे आता कोणता संघ विजय मिळवणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

DC vs RR : ध्रुव-रियानचा अर्धशतकी तडाखा, दिल्लीसमोर 194 रन्सचं टार्गेट, राजस्थान जिंकणार?
Dhruv Jurel and Riyan Parag RR vs DCImage Credit source: Bcci
| Updated on: May 17, 2026 | 10:47 PM
Share

वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल आणि कॅप्टन रियान पराग या युवा त्रिकुटाने केलेल्या फायर खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2026 (IPL 2026) स्पर्धेच्या 62 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्ससमोर 194 धावांचं आव्हान ठेवलं आहे. वैभव सूर्यवंशी याने झंझावाती खेळी करुन राजस्थानला दमदार सुरुवात मिळवून दिली. मात्र त्यानंतरही राजस्थानला 200 धावांचा आकडा गाठता आला नाही. दिल्लीच्या मिचेल स्टार्क आणि इतर गोलंदाजांनी शेवटच्या टप्यात राजस्थानला झटपट झटके दिले. त्यामुळे आता दिल्ली 194 धावा करुन सामना जिंकणार की राजस्थान 2 गुणांची कमाई करणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.

राजस्थानची बॅटिंग

दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेल याने टॉस जिंकून राजस्थान बॅटिंगसाठी भाग पाडलं. यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी सलामी जोडी राजस्थानला भक्कम सुरुवात मिळवून देणयात अपयशी ठरली. दिल्लीने राजस्थानला 19 धावांवर यशस्वी जैस्वाल याला आऊट करत पहिला झटका दिला. यशस्वीने 12 धावा केल्या. लुंगी एन्गिडी याने यशस्वीला आऊट केलं.

ध्रुवची जबरदस्त खेळी

त्यानंतर राजस्थानच्या फलंदाजांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करुन दिली. त्यामुळे राजस्थान सहज 200-220 धावांपर्यंत पोहचेल असं चित्र होतं. मात्र तसं झालं नाही.

वैभव सूर्यवंशी आणि ध्रुव जुरेल या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी फक्त 34 बॉलमध्ये 70 रन्सची पार्टनरशीप केली. वैभव सूर्यवंशीचं अर्धशतक अवघ्या 4 धावांनी हुकलं. वैभवने 21 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 5 फोरसह 46 रन्स केल्या. वैभव आऊट झाल्यानंतर ध्रुव आणि कॅप्टन रियानने तिसऱ्या विकेटसाठी 41 चेंडूत 72 धावांची भागीदारी केली. रियान पराग 40 बॉलमध्ये 53 रन्स करुन आऊट झाला. इथून राजस्थानची पडझड झाली.

राजस्थानची पडझड

दिल्लीच्या टॉप ऑर्डरने उल्लेखनीय बॅटिंग केल्यानंतर मिडल आणि लोअर मिडल ऑर्डरमधील फलंदाजांनी दिल्लीच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. दिल्लीने राजस्थानला 30 धावांच्या मोबदल्यात 6 झटके दिले. त्यामुळे राजस्थानची 161-2 वरुन 191-8 अशी स्थिती झाली. राजस्थानसाठी टॉप ऑर्डरमधील तिघांशिवाय दासुन शनाका याने 10 धावा केल्या. त्याव्यतिरिक्त इतर कुणालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. दिल्लीसाठी मिचेल स्टार्क याने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. तर लुंगी एन्गिडी आणि माधव तिवारी या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. त्यामुळे आता सामन्याचा निकाल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहण्यासाठी आणखी काही तास वाट पाहावी लागणार आहे.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?