RCB vs GT Final : वॉशिंग्टन सुंदरचं झुंजार अर्धशतक, आरसीबीसमोर 156 रन्सचं टार्गेट, गुजरात रोखणार की बंगळुरु जिंकणार?

Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans IPL 2026 Final 1st Innings Highlights : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला सलग आणि एकूण दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी गुजरात टायटन्स विरुद्ध 156 धावा कराव्या लागणार आहेत.

RCB vs GT Final : वॉशिंग्टन सुंदरचं झुंजार अर्धशतक, आरसीबीसमोर 156 रन्सचं टार्गेट, गुजरात रोखणार की बंगळुरु जिंकणार?
Washington Sundar RCB vs GT Final
Image Credit source: IPL X Account
| Updated on: May 31, 2026 | 10:28 PM

ऑलराउंडर वॉशिंग्टन सुंदर याने केलेल्या चिवट, झुंजार आणि नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्सने आपल्या घरच्या मैदानात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात (IPL 2026) सन्मानजनक आव्हान ठेवलं आहे. गुजरातने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आरसीबीसमोर 156 रन्सचं टार्गेट ठेवलं आहे. गुजरातकडून वॉशिंग्टन सुंदर याच्यासह एकूण 6 फलंदाजांना ठिकठाक सुरुवात मिळाली. मात्र सुंदरचा अपवाद वगळता 5 पैकी एकाही फलंदाजाला काही खास करता आलं नाही. त्यामुळे आरसीबीसमोर गुजरातला 155 धावांपर्यंतच पोहचता आलं. आरसीबीच्या गोलंदाजांनी चिवट बॉलिंग करत गुजरातला मोठी धावसंख्या करण्यापासून यशस्वीरित्या रोखलं. आता आरसीबीचे फलंदाज हे आव्हान पूर्ण करुन सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवणार की नाही? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

गुजरातची बॅटिंग

कॅप्टन रजत पाटीदार याने टॉस जिंकून गुजरातला बॅटिंगसाठी भाग पाडलं. साई सुदर्शन आणि कॅप्टन शुबमन गिल या सलामी जोडीने स्पर्धेच्या इतिहासात गुजरातसाठी एकूण 11 वेळा शतकी सलामी भागीदारी केली आहे. त्यामुळे या दोघांकडून महाअंतिम सामन्यात जबरदस्त अशा सुरुवातीची आशा होती. मात्र आरसीबीच्या गोलंदाजांनी कमाल केली. आरसीबीच्या गोलंदाजांनी गुजरातला संयमी सुरुवातीनंतर सलामी जोडीला स्वस्तात मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

जोश हेझलवूड याने शुबमन गिल याला कॅप्टन रजत पाटीदार याच्या हाती कॅच आऊट केलं. शुबमनने 10 रन्स केल्या. तर भुवनेश्वर कुमार याने साई सुदर्शन याला विकेटकीपर जितेश शर्मा याच्या हाती 12 रन्सवर कॅच आऊट केलं. निशांत सिंधू याला आश्वासक सुरुवात मिळाली . मात्र रसीख सलाम डार याने निशांतचा गेम केला. रसीखने निशांतला 20 रन्सवर आऊट केलं. जोस बटलर याच्याकडून मोठ्या खेळीची आशा होती. मात्र बटलरने निराशा केली. बटलरने 19 धावा केल्या. तर अर्शद खान याने 15 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.

वॉशिंग्टन सुंदरची एकाकी झुंज

एका बाजूला आरसीबीचे गोलंदाज गुजरातला ठराविक अंतराने झटके देत होते. तर दुसऱ्या बाजूला सुंदर टिकून खेळत होता. सुंदरने एक एक धाव जोडून आणि संधी मिळेल तसे मोठे फटके मारले. सुंदरने यासह अर्धशतक झळकावलं. सुंदरने 37 बॉलमध्ये 5 फोरसह हे अर्धशतक पूर्ण केलं. पाचव्या स्थानी आलेल्या सुंदरने शेपटीच्या फलंदाजांना सोबतीला घेऊन गुजरातला 150 पार पोहचवलं.

लाईव्ह स्कोअरकार्ड


गुजरातसाठी राहुल तेवतिया, राशीद खान आणि जेसन होल्डर या तिघांनी प्रत्येकी 7-7 धावा केल्या. तर वॉशिंग्टन सुंदर आणि कगिसो रबाडा हे दोघे नॉट आऊट परतले. रबाडाने 3 रन्स केल्या. तर सुंदरने सर्वाधिक योगदान दिलं. सुंदरने 37 बॉलमध्ये 135 च्या स्ट्राईक रेटने 50 धावा केल्या. सुंदरने त्यापैकी 20 धावा या चौकारांच्या मदतीने केल्या. सुंदरने या खेळीत 5 चौकार लगावले. आरसीबीसाठी रसीख सलाम डार याने तिघांना आऊट केलं. भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर कृणाल पंड्या याने 1 शिकार केली.

Follow Us