AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : गुजरात टायटन्स की राजस्थान रॉयल्स! कोणाचं पारडं जड? वाचा हेड टू हेड आकडेवारी

आयपीएल 2026 स्पर्धेतील नववा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होत आहे. हा सामना गुजरात टायटन्ससाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण पहिल्या सामन्यात पराभव झाल्याने कमबॅक करणं भाग आहे.

IPL 2026 : गुजरात टायटन्स की राजस्थान रॉयल्स! कोणाचं पारडं जड? वाचा हेड टू हेड आकडेवारी
IPL 2026 : गुजरात टायटन्स की राजस्थान रॉयल्स! कोणाचं पारडं जड? वाचा हेड टू हेड आकडेवारीImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 03, 2026 | 11:11 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धा आता प्रत्येक सामन्यानंतर पुढे सरकत आहे. या स्पर्धेतील नववा सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होत आहे. राजस्थान रॉयल्सने पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला होता. तर गुजरात टायटन्सला पंजाब किंग्सकडून पराभवाचं तोंड पाहावं लागलं होतं. त्यामुळे हा सामना गुजरात टायटन्ससाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण या सामन्यात विजय मिळवला तर टॉप 4 मध्ये आशा पल्लवीत होत जातील. अन्यथा विजयाचं दडपण वाढत जाईल. हा सामना गुजरात टायटन्सचं होमग्राउंड असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. हा सामना 4 एप्रिल रोजी संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. तशी हेड टू हेड आकडेवारी पाहिली तर गुजरात टायटन्सचं पारडं जड आहे. पण राजस्थानचा संघ नव्याने बांधला असून खेळाडू फॉर्मात आहेत. त्यामुळे गुजरात टायटन्सपुढे आव्हान असणार आहे.

गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स हेड टू हेड

आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स हे संघ 8 वेळा आमनेसामने आले आहेत. यात गुजरात टायटन्सचं पारडं जड आहे. गुजरातने 6 वेळा राजस्थानला मात दिली आहे. तर राजस्थान रॉयल्सचा संघ 2 वेळा विजय मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. गुजरात टायटन्सने राजस्थानविरुद्ध सर्वाधिक 217 धावा केल्या आहेत. तर राजस्थान रॉयल्सने सर्वाधिक 212 धावा केल्या आहेत. तर गुजरात टायटन्सचा सर्वात कमी स्कोअर हा 119, राज्स्थान सर्वात कमी स्कोअर हा 118 आहे.

नाणेफेकीचा कौल कोणाच्या बाजूने?

राजस्थान रॉयल्सचा संघ हा नाणेफेकीत लकी ठरला आहे. राजस्थान रॉयल्सने 6 वेळा नाणेफेकीचा कौल जिंकला आहे. तर गुजरात टायटन्स फक्त दोनदा नाणेफेक जिंकली आहे. गुजरात टायटन्सने दोन वेळा नाणेफेक जिंकली आणि दोन्ही वेळेस क्षेत्ररक्षण निवडली. या दोन्ही सामन्यात गुजरात टायटन्सने विजय मिळवला. दुसरीकडे, राजस्थानने 6 वेळा नाणेफेक जिंकल्यानंतर दोन वेळा फलंदाजी आणि 4 वेळा क्षेत्ररक्षण निवडलं होतं. यात फक्त दोन सामने जिंकले आहेत. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्यासाठी प्राधान्य दिलं जाईल.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा