AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR vs SRH : हैदराबादचा 65 धावांनी जबरदस्त विजय, केकेआरचा सलग दुसरा पराभव

Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Match Result IPL 2026 : कोलकाता नाईट रायडर्सला अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात 19 व्या हंगामात एकूण आणि सलग दुसरा तर घरच्या मैदानात पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला.

KKR vs SRH : हैदराबादचा 65 धावांनी जबरदस्त विजय, केकेआरचा सलग दुसरा पराभव
Jaydev Undadkat KKR vs SRHImage Credit source: IPL/BCCI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 03, 2026 | 7:03 AM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) सहाव्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सवर एकतर्फी फरकाने मात करत विजयाचं खातं उघडलं आहे. हैदराबादने कोलकातासमोर 227 धावांचं अवघड आव्हान ठेवलं होतं. या विजयी धावांच्या प्रत्युत्तरात कोलकाताला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. हैदराबादने केकेआरला 16 ओव्हरमध्ये 161 रन्सवर गुडाळलं. हैदराबादने अशाप्रकारे हा सामना 65 धावांनी जिंकला आणि पहिल्या पराभवानंतर आपल्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला. तर केकेआरला 2012 नंतर पहिल्यांदा सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. केकेआर या मोसमात आतापर्यंत घरच्या मैदानात सामना गमावणारी पहिली टीम ठरली.

सामन्याचा आढावा

कोलकाता नाईट रायडर्सने टॉस जिंकून सनरायजर्स हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलं. सनरायजर्स हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 226 धावा केल्या. सनरायजर्स हैदराबादसाठी चौघांनी सर्वाधिक आणि स्फोटक खेळी केली. ट्रेव्हीस हेड याने 46 धावांचं योगदान दिलं. तर अभिषेक शर्मा याने 48 धावा केल्या. दोघांचं अर्धशतक अवघ्या काही धावांसाठी हुकलं. मात्र दोघांनी वैयक्तिक विक्रमाची पर्वा न करता टीमसाठी जास्तीत जास्त योगदान कसं देता येईल याचा विचार केला आणि फटकेबाजी केली.

ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी याने निर्णायक योगदान दिलं. नितीशने 24 चेंडूत 39 रन्स केल्या. कॅप्टन इशान किशन याने 14 धावा केल्या. तर हेन्रिक क्लासेन याने सर्वाधिक धावा केल्या. क्लासेनने 35 चेंडूत 52 धावांचं योगदान दिलं. केकेआरसाठी ब्लेसिंग मुजरबानी याने सर्वाधिक विकेट्स मिळवल्या. ब्लेसिंगने हैदराबादच्या 4 फलंदाजंना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

हैदराबादचा विजय

केकेआरचं 24 बॉलआधीच पॅकअप

केकेआरला 227 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चांगल्या, मोठ्या आणि वेगवान सुरुवातीची गरज होती. मात्र केकेआरला धावांच्या तुलनेत काही खास करता आलं नाही. हैदराबादने केकेआरला ठराविक अंतराने झटेक देत 16 ओव्हरमध्ये 161 रन्सवर गुंडाळलं. केकेआरसाठी अंगकृष रघुवंशी याने सर्वाधिक धावा केल्या. अंगकृषने 29 बॉलमध्ये 52 रन्स करुन आऊट झाला. अंगकृष रन आऊट झाला. उपकर्णधार रिंकु सिंग याने 35 धावा जोडल्या. फिन एलन याने 28 रन्स केल्या. या व्यतिरिक्त एकालाही 20 पार पोहचता आलं नाही. हैदराबादसाठी जयदेव उनाडकट याने तिघांना आऊट केलं. तर एशान मलिंगा आणि नितीश कुमार रेड्डी या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर हर्ष दुबे याने 1 विकेट मिळवत इतरांना चांगली साथ दिली. बॅटिंग आणि बॉलिंगने योगदान देणारा नितीश कुमार रेड्डी मॅन ऑफ द मॅच ठरला.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा