AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR vs SRH : हैदराबादचं 2024 पासून 13 वं द्विशतक, केकेआरसमोर 227 रन्सचं टार्गेट, कोण जिंकणार?

Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad 1st Innings Highlights : कोलकाताने आक्रमक सुरुवात केलेल्या हैदराबादला 7 धावांच्या मोबदल्यात 3 झटके देऊन बॅकफुटवर टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हैदराबादने सलग दुसऱ्यांदा 200 पार मजल मारली.

KKR vs SRH : हैदराबादचं 2024 पासून 13 वं द्विशतक, केकेआरसमोर 227 रन्सचं टार्गेट, कोण जिंकणार?
Heinrich Klaasen and Nitish Kumar ReddyImage Credit source: IPL X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 02, 2026 | 10:05 PM
Share

सनरायजर्स हैदराबादने आयपीएलच्या 19 व्या मोसमातील आपल्या दुसऱ्या सामन्यातही तडाखा कायम ठेवला आहे. हैदराबादने सलग सलग दुसऱ्या सामन्यातही 200 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. हैदराबादने आरसीबीनंतर आता 2 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धही धावांचं द्विशतक पूर्ण केलं आहे. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 226 धावा केल्या आहेत. अशात आता कोलकाता नाईट रायडर्स 227 धावांचं आव्हान गाठत विजय मिळवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. केकेआर आणि हैदराबादची या मोसमातील सुरुवात पराभवाने झालीय. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वाचा आहे.

सनरायजर्स हैदराबादचं द्विशतक

हैदराबादची आयपीएल स्पर्धेत 2024 पासून 200 पेक्षा अधिक धावा करण्याची ही 13 वी वेळ ठरली आहे. हैदराबादसाठी एकूण 5 फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. मात्र चौघांनी प्रमुख योगदान दिलं. हैदराबादला ट्रेव्हीस हेड आणि अभिषेक शर्मा या दोघांनी आक्रमक सुरुवात करुन दिली. मधल्या फळीत कॅप्टन इशान किशन याने ठिकठाक धावा केल्या. नितीश कुमार रेड्डी याने महत्त्वपूर्ण खेळी केली. तर हेन्रिक क्लासेन याने अर्धशतक ठोकत हैदराबादसाठी सर्वाधिक धावांचं योगदान दिलं.

एसआरएचची बॅटिंग, हेन्रिक क्लासेनचं अर्धशतक

ट्रेव्हीस हेड आणि अभिषेक शर्मा या सलामी जोडीने दोघांनी हैदराबादला अप्रतिम सुरुवात मिळवून दिली. या दोघांनी 5.4 ओव्हरमध्ये 82 रन्सची पार्टनरशीप केली. त्यानंतर हेड 46 धावा करुन आऊट झाला. हेडनंतर इशानने 14 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. अभिषेकने 21 चेंडूत 48 रन्स केल्या. अनिकेत वर्मा याला 1 धावेवर आऊट केलं. त्यामुळे हैदराबादची 4 आऊट 118 अशी स्थिती झाली.

पाचव्या विकेटसाठी निर्णायक भागीदारी

त्यानंतर क्लासेन आणि नितीश कुमार रेड्डी या जोडीने पाचव्या विकेटसाठी 53 चेंडूत 82 धावांचं योगदान दिलं. नितीश आऊट होताच ही जोडी फुटली. नितीशने 39 रन्स केल्या. दुसऱ्या बॉलवर सलील अरोरा गोल्डन डक ठरला. हेनरिक क्लासेन याने 35 बॉलमध्ये 52 रन्स केल्या. शिवांग कुमार याने 4 तर हर्ष दुबेने नाबाद 9 धावा केल्या.

केकेआरच्या ब्लेसिंग मुजरबानी याचा चौकार

केकेआरकडून ब्लेसिंग मुजरबानी याने 4 विकेट्स मिळवल्या. वैभव अरोरा याने दोघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर कार्तिक त्यागी आणि अनुकूल रॉय या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा