AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR vs SRH : ब्लेसिंग-अनुकूलची कमाल, हैदराबादला 7 रन्समध्ये 3 झटके, केकेआरचं कडक कमबॅक

Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad : सनरायजर्स हैदराबादच्या सलामी जोडीने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध ट्रेडमार्क अशी आक्रमक सुरुवात केली. मात्र त्यानंतर केकेआरच्या गोलंदाजांनी कमाल करत हैदराबादला अवघ्या 7 धावांत 3 झटके दिले.

KKR vs SRH : ब्लेसिंग-अनुकूलची कमाल, हैदराबादला 7 रन्समध्ये 3 झटके, केकेआरचं कडक कमबॅक
blessing muzarabani and Abhishek SharmaImage Credit source: IPL X Account
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 02, 2026 | 9:21 PM
Share

सनरायजर्स हैदराबादने आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील सहाव्या आणि आपल्या दुसऱ्या सामन्यात होम टीम कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध आक्रमक सुरुवात केली. केकेआर कॅप्टन अजिंक्य रहाणे याने नाणेफेक जिंकून सनरायजर्स हैदराबादला बॅटिंगसाठी भाग पाडलं. हैदराबादच्या अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हीस हेड या सलामी जोडीने या संधीचा चांगला फायदा घेत पावरप्लेमध्ये तडाखेदार बॅटिंग केली. हेड आणि शर्माने पावरप्लेच्या पहिल्या 6 ओव्हरचा पूर्ण फायदा घेत हैदराबादला आक्रमक सुरुवात करुन दिली आणि मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.

हेड-शर्मा सलामी जोडीचा तडाखा

हेड आणि शर्मा या दोघांनी 5.3 ओव्हरमध्ये 82 धावा जोडल्या. ही जोडीने केकेआरसाठी डोकेदुखी ठरत होती. अशात कार्तिक त्यागी याने ही सेट जोडी फोडली. कार्तिकने सहाव्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर हेडला कॅमरुन ग्रीन याच्या हाती कॅच आऊट केलं. हेडने 21 बॉलमध्ये 219.05 च्या स्ट्राईक रेटने 46 रन्स केल्या आणि आपली भूमिका चोखपणे पार पाडली. हेडने या खेळीत 3 षटकार आणि 6 चौकार लगावले.

त्यानंतर अभिषेक आणि कॅप्टन इशान किशन या दोघांनी धावांचा वेग कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. या जोडीने जम बसवला. मात्र त्यानंतर केकेआरच्या गोलंदाजांनी कमाल केली. झिंबाब्वेच्या ब्लेसिंग मुझरबानी एकाच ओव्हरमध्ये हैदराबादच्या 2 सेट फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर अनुकूल रॉय याने 1 विकेट मिळवत हैदराबादच्या धावा रोखण्याचा प्रयत्न केला.

केकेआरने हैदराबादला अवघ्या 7 बॉलमध्ये 3 झटके दिले. त्यामुळे हैदराबादची स्थिती 111-1 वरुन 118-4 अशी झाली. त्यामुळे केकेआरचे गोलंदाज इथून पुढे हैदराबादवर पकड कायम ठेवण्यात यशस्वी ठरणार का? हे डाव आटोपल्यानंतरच स्पष्ट होईल.

ब्लेसिंगकडून एकाच ओव्हरमध्ये दोघांचा गेम

ब्लेसिंगने नवव्या ओव्हरमध्ये इशान किशन आणि त्यानंतर अभिषेक शर्मा या विस्फोटक फलंदाजांना आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. ब्लेसिंगने दुसऱ्या बॉलवर इशान किशन याला उपकर्णधार रिंकु सिंह याच्या हाती सीमारेषेवर झेलबाद केलं. त्यानंतर ब्लेसिंगने चौथ्या बॉलवर अभिषेकला वरुण चक्रवर्ती याच्या हाती कॅच आऊट केलं. इशानने 14 तर अभिषेकने 48 धावांची खेळी केली.

त्यानंतर दहाव्या ओव्हरमध्ये अनुकूल रॉय याने अनिकेत वर्मा याला रिंकुच्या हाती 1 रनवर कॅच आऊट केलं. त्यामुळे हैदराबादची 9.2 ओव्हरमध्ये 4 आऊट 118 असा स्कोअर झाला. आता हैदराबाद इथून किती धावा जोडण्यात यशस्वी ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा