AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LSG IPL 2026 : ..तर ऋषभ पंतचा लखनौ टीममधून पत्ता कट? संजीव गोयंका यांच्या क्रिप्टीक पोस्टची चर्चा

Lucknow Super Giants IPL 2026 : उद्योगपती आणि लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका यांनी आयपीएलच्या 19 व्या मोसमाआधी सूचक पोस्ट केली आहे. या पोस्टची एकच चर्चा पाहायला मिळत आहे.

LSG IPL 2026 : ..तर ऋषभ पंतचा लखनौ टीममधून पत्ता कट? संजीव गोयंका यांच्या क्रिप्टीक पोस्टची चर्चा
Sanjiv Goenka and Rishabh PantImage Credit source: PTI
| Updated on: Mar 20, 2026 | 3:17 AM
Share

आयपीएलच्या 19 व्या मोसमाला 28 मार्चपासून सुरुवात होत आहे. लखनौ सुपर जांयट्सला या स्पर्धेच्या इतिहासात काही खास करता आलेलं नाही. लखनौची ट्रॉफीची प्रतिक्षा कायम आहे. ऋषभ पंत याच्या नेतृत्वात लखनौला ट्रॉफी जिंकता आलेली नाही. त्यामुळे लखनौ यंदा ट्रॉफीची प्रतिक्षा संपवण्याच्या तयारीने मैदानात उतरणार आहेत. मात्र अशात लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका यांच्या एका पोस्टमुळे एकच चर्चा रंगली आहे. गोयंका यांच्या या पोस्टचे अनेक अर्थ काढले जात आहेत. 19 व्या मोसमाला अवघे काही दिवस बाकी असल्याने ही पोस्ट लखनौ टीममधील खेळाडूंसाठी आहे, असं म्हटलं जात आहे.

लखनौचा पहिला सामना कधी?

लखनौ सुपर जायंट्स 19 व्या मोसमातील आपला पहिला सामना हा 1 एप्रिलला खेळणार आहे. लखनौसमोर या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सचं आव्हान असणार आहे. लखनौला गेल्या हंगामात काही खास करता आलं नाही. लखनौचं सातव्या स्थानी आव्हान संपुष्टात आलं होतं. त्यामुळे यंदा लखनौ अविस्मरणीय कामगिरी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

ऋषभ पंत याचा या मोसमात फलंदाज, विकेटकीपर आणि कर्णधार अशा तिहेरी भूमिका बजावताना कस लागणार आहे. पंतला गेल्या मोसमात बॅटिंगनेही काही खास करता आलं नव्हतं. पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे. त्यामुळे पंतवर तेही दडपण असणार आहे. त्यामुळे पंतसमोर स्वत:ला फलंदाज, विकेटकीपर आणि यशस्वी कर्णधार म्हणून सिद्ध करण्याचं आव्हान असणार आहे.

संजीव गोयंका यांची सूचक पोस्ट

कर्णधार आणि फलंदाज म्हणून या हंगामात निराशाजनक कामगिरी झाल्यास आपल्या अडचणींत वाढ होईल, याची जाणिव पंतला आहे. गोयंका यांच्या सूचक पोस्टमुळे चर्चा रंगली आहे. गोयंकांनी स्पर्धेला 13 दिवस बाकी असताना ही पोस्ट केलीय. त्यामुळे या टायमिंगमुळे अनेक तर्कवितर्क पाहायला मिळत आहे.

“लोकं कसं आणि काय आऊटपूट देतात मी त्यांचं मूल्यमापन करतो. तसेच मी कोण किती तास थांबून काम करतोय हे पाहत नाही. आऊटपूट एकमेव मापदंड आहे”, असं संजीव गोयंका यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान लखनौ आयपीएल मोहिमेतील आपला पहिला सामना हा 1 एप्रिलला होणार आहे. लखनौसमोर दिल्ली कॅपिट्ल्सचं आव्हान असणार आहे. लखनौ त्यानंतर रविवारी 5 एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध भिडणार आहे. लखनौचा साखळी फेरीतील तिसरा सामना 9 एप्रिलला होणार आहे. तर चौथा आणि शेवटचा सामना हा 12 एप्रिलला गुजरात टायटन्स विरुद्ध होणार आहे. एकूण 4 राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमुळे बीसीसीआयने आयपीएलच्या 19 व्या मोसमातील पहिल्या 20 सामन्यांचंच वेळापत्रक जाहीर केलं आहे.

Follow Us
खासदार निधीच्या आरोपांवर ओमाराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले एक रुपय
Omraje Nimbalkar | खासदार निधीच्या आरोपांवर ओमाराजेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले एक रुपयाही...
ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांबाबत सर्वात मोठी अपडेट! महाराष्ट्र नाही आता
ठाकरेंच्या 6 फुटीर खासदारांबाबत सर्वात मोठी अपडेट! महाराष्ट्र नाही आता दिल्लीतील...नेमका निर्णय काय?
कोण होतास तू, काय झालास तू...; विधानसभेत शिंदेंकडून टोलेबाजी
Eknath Shinde On Thackeray | कोण होतास तू, काय झालास तू...; विधानसभेत शिंदेंकडून कविता म्हणत टोलेबाजी
कोस्टल रोडवर अपघात अन् मुंबई ठप्प! वरळी ते नरिमन पॉईंटपर्यंत...
Coastal Road Accident | कोस्टल रोडवर अपघात अन् मुंबई ठप्प! वरळी ते नरिमन पॉईंटपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा
तुम्ही पाहिलंत का? भर मंचावर राहुल शेवाळेंनी सांगितलं तरी...
तुम्ही पाहिलंत का? भर मंचावर राहुल शेवाळेंनी सांगितलं तरी... पक्षप्रवेशावेळी ओमराजेंच्या बॉडी लँग्वेजचीच चर्चा!
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मंत्र्यांची दांडी! विरोधक आक्रमक
Vidhansabha Rada | विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मंत्र्यांची दांडी! विरोधक आक्रमक
शिंदे-ठाकरे एकत्र या... शिंदेंच्या विश्वासू नेत्याची हाक...
मोठी बातमी! शिंदे-ठाकरे एकत्र या... शिंदेंच्या विश्वासू नेत्याची हाक; राजकीय समीकरणं बदलणार?
बंडखोर खासदारांच्या खासदारकीची प्रक्रिया पुर्ण होऊच शकत नाही...
बंडखोर खासदारांच्या खासदारकीची प्रक्रिया पुर्ण होऊच शकत नाही', बड्या नेत्याचं खळबळजनक विधान
पवनराजेंच्या हत्येपासूनचा वैर अन्... पद्मसिंह पाटलांच्या मुलाचं ओमराजे
पवनराजेंच्या हत्येपासूनचा वैर अन्... पद्मसिंह पाटलांच्या मुलाचं ओमराजेंबाबत मोठं विधान; महायुतीत आता...
आमदारकीचं गुपित उघडलं? देवाभाऊंकडे दैवी शक्ती...; त्या नेत्याच्या
आमदारकीचं गुपित उघडलं? देवाभाऊंकडे दैवी शक्ती...; त्या नेत्याच्या वक्तव्याने राजकारणात खळबळ!