AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 Points Table : केकेआर-पंजाब सामना पावसामुळे रद्द, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी कोण?

IPL 2026 Points Table : आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 12 वा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे मिळालेल्या 1 गुणामुळे पुन्हा नंबर 1 टीम बदलली आहे. जाणून घ्या.

IPL 2026 Points Table : केकेआर-पंजाब सामना पावसामुळे रद्द, पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी कोण?
Punjab Kings IPL 2026Image Credit source: Bcci
| Updated on: Apr 07, 2026 | 3:40 PM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 12 वा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. या 12 व्या सामन्यात यजमान कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स आमेनसामने होते. सामना रद्द करण्यात आल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला. या 1 गुणामुळे सलग 2 सामने गमावणाऱ्या केकेआरचं खातं उघडलं. हा सामना रद्द झाल्याने केकेआरला आपल्या पहिल्या विजयासाठी मॅचची प्रतिक्षा करावी लागणार आहे. तर सलग 2 सामने जिंकणाऱ्या पंजाबची केकेआर विरुद्धचा सामना रद्द झाल्याने विजयी हॅट्रिक मिळवण्याची संधी हुकली. आता या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलचं काय चित्र आहे? हे आपण जाणून घेऊयात.

कोलकाताने पंजाब विरुद्ध टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र केकेआरच्या डावातील 3.4 ओव्हरनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे सामना रद्द करण्यात आला. या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये बदल झाला आहे.

सामना रद्द झाल्याने पंजाबचा फायदा

केकेआर विरुद्ध पंजाब सामना रद्द झाला. पंजाबने आधीच सलग 2 सामने जिंकले आहेत. त्यात केकेआर-पंजाब सामना पावसामुळे रद्द करावा लागला. त्यामुळे पंजाबच्या खात्यात एकूण 5 गुण झाले. पंजाबला या विजयामुळे फायदा झालाय. पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला मागे टाकून पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. पंजाबने पहिल्या स्थान मिळवल्याने आरसीबीची पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.

ताज्या आकडेवारीनुसार, पंजाबने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर पंजाबला एकदा पराभूत व्हावं लागलंय. पंजाबचा नेट रनरेट हा +0.637 असा आहे. तर आरसीबीची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.

केकेआर 8व्या स्थानी

तसेच केकेआरचं हा सामना रद्द झाल्याने गुणांचं खातं उघडलं. केकेआरला यासह पॉइंट्स टेबलमध्ये फायदा झाला आहे. केकेआर पॉइंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानी पोहचली आहे. केकेआर या सामन्याआधी पॉइंट्स टेबलमध्ये  शेवटून दुसऱ्या अर्थात नवव्या स्थानी होती.

चेन्नई शेवटून नंबर 1

सलग 3 पराभवांनतर चेन्नईची पॉइंट्स टेबलमध्ये 10 व्या स्थानी घसरण झाली आहे. चेन्नईची पहिल्या तिन्ही सामन्यात अपवाद वगळता निराशाजनक कामगिरी राहिली आहे.

मंगळवारी मुंबई-दिल्ली सामना

दरम्यान मंगळवारी 7 एप्रिलला 19 व्या मोसमातील 13 वा सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना होणार आहे. मुंबईसमोर या सामन्यात विजय मिळवून विजयी ट्रॅकवर परतण्याचं आव्हान असणार आहे.

Follow Us
राष्ट्रवादीचं विलिनीकरण?; सुप्रिया सुळेंनी उघड केली इनसाईड स्टोरी...
राष्ट्रवादीचं विलिनीकरण?; सुप्रिया सुळेंनी उघड केली इनसाईड स्टोरी, म्हणाल्या...
हो... कदरूपणा आहे! राऊतांचं शिंदेंना चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
हो... कदरूपणा आहे! राऊतांचं शिंदेंना चोख प्रत्युत्तर; म्हणाले, बाळासाहेबांच्या शिवसेनेवर दरोडा...
रमेश म्हात्रेंच्या भवितव्याचा आज फैसला होणार?; दोन दिवस रुग्णालयात...
Ramesh Mhatre Case | दोन दिवस रुग्णालयात उपचार...आता थेट कोर्टात!; रमेश म्हात्रेंच्या भवितव्याचा आज फैसला होणार?
ठाकरेंचे 12 नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात?; ऑपरेशन टायगर पुन्हा...
मोठी घडामोड! ऑपरेशन टायगर पुन्हा अ‍ॅक्टिव्ह; ठाकरेंचे 12 नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात?
विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या
Big Breaking | विनोद तावडेंनी जयंत पाटलांनंतर आणखी एका नेत्याची घेतली भेट, पवारांच्या राष्ट्रवादीत चाललंय तरी काय?
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना
उद्धव ठाकरेंचा कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंबा? थेट सोनम वांगचूक यांना फोन केला अन्...
भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना ठाकरेंचा सवाल; दानपेटीची चोरी...
Aaditya Thackeray | दानपेटीची चोरी करणाऱ्यांसोबत जाणार का? भाजपसोबत जाणाच्या विचारात असलेल्यांना आदित्य ठाकरेंचा सवाल
भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
Pune | पुण्यात आज भक्तीचा महासंगम! ज्ञानोबा-तुकाराम पालखीचे आगमन; वारकरी-धारकरी एकत्र
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या
मोठी बातमी! पवारांच्या पक्षाचं सुद्धा ठाकरेंसारखंच... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर..
राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात मुख्यमंत्र्यांसह...