AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026, MI vs DC : रोहित शर्माची मानाची ऑरेंज कॅप अवघ्या काही तासातच गेली, झालं असं की..

आयपीएल 2026 स्पर्धेतील आठव्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत झाली. हा सामना दिल्ली कॅपिटल्सने सहज जिंकला. या सामन्यात समीर रिझवीने जबरदस्त खेळी केली. तसेच रोहित शर्माच्या डोक्यावरील ऑरेंज कॅप हिसकावून घेतली.

IPL 2026, MI vs DC : रोहित शर्माची मानाची ऑरेंज कॅप अवघ्या काही तासातच गेली, झालं असं की..
IPL 2026, MI vs DC : रोहित शर्माची मानाची ऑरेंज कॅप अवघ्या काही तासातच गेली, झालं असं की..Image Credit source: DC Twitter/IPL
| Updated on: Apr 04, 2026 | 7:57 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतील आठव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा संघ मुंबई इंडियन्सपेक्षा वरचढ ठरला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तसेच मुंबई इंडियन्सला 162 धावांवर रोखलं. विजयासाठी असलेलं 163 धावांचं आव्हान दिल्ली कॅपिटल्सने 3 गडी गमवून पूर्ण केलं. या विजयात मोलाचा हातभार लागला तो समीर रिझवीचा.. त्याच्या आक्रमक खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सला मुंबई इंडियन्सवर सहज विजय मिळवता आला. दिल्ली कॅपिटल्सने विजयासाठी दिलेल्या 163 धावांचं आव्हान 18.1 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं. यासह या स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. तर मुंबई इंडियन्सला पहिल्या विजयानंतर दुसऱ्या सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.

समीर रिझवीला ऑरेंज कॅप

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स सामन्यातील पहिल्या डावात रोहित शर्माने ऑरेंज कॅप मिळवली होती. 35 धावांची खेळी करून पंजाब किंग्सच्या कूपर कोनोलीला मागे टाकलं होतं. रोहित शर्मा 113 धावांसह आघाडीवर होता. पण समीर रिझवीने हा आनंद त्याला फार काळ टिकवू दिला नाही. सर्वाधिक धावांच्या यादीत समीर रिझवी 70 धावांसह दहाव्या स्थानावर होता. त्यामुळे या सामन्यात रोहित शर्माला मागे टाकेल असं वाटलं नव्हतं. पण रिझवीने करून दाखवलं. समीर रिझवी या सामन्यात 50 चेंडूत 90 धावा करून बाद झाला आणि रोहित शर्माच्या पुढे निघून गेला. समीर रिझवीच्या नावावर आता 121 धावा असून पहिल्या स्थानावर पोहोचला आहे आणि मानाची ऑरेंज कॅप मिळवली आहे.

समीर रिझवीने 26 चेंडूत अर्धशत पूर्ण केलं. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 200 चा होता. 90 धावांच्या या खेळीत त्याने ऑफ साईडला फक्त 24 चेंडूत 32 धावा यात त्याचा स्ट्राईक रेट हा 133.3 चा होता. समीर रिझवीने वेगवान गोलंदाजांविरुद्ध 33 चेंडूंत 63 धावा, तर फिरकी गोलंदाजांविरुद्ध 18 चेंडूंत 27 धावा काढल्या. आयपीएलमधील समीर रिझवीच्या शेवटच्या 3 खेळी पाहिल्या तर त्याने सलग तिसरं अर्धशतक ठोकलं आहे. आयपीएल 2025 स्पर्धेत पंजाब किंग्सविरुद्ध 25 चेंडूत नाबाद 58, आयपीएल 2026 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध नाबाद 70 धावा, तर मुंबई इंडियन्सविरुद्ध 90 धावांची खेळी केली आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा