AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 Points Table : गुजरातचा पहिला विजय, पॉइंट्स टेबलचं चित्र बदललं, मुंबईला मोठा झटका, नंबर 1 कोण?

IPL 2026 Points Table : गुजरात टायटन्सने पहिला विजय मिळवला आहे. त्यामुळे पॉइंट्स टेबलमधील शेवटच्या 5 संघांमध्ये उलथापालथ झाली आहे. मात्र अव्वल 5 संघ पॉइंट्स टेबलमध्ये आपल्या स्थानी कायम आहेत.

IPL 2026 Points Table : गुजरातचा पहिला विजय, पॉइंट्स टेबलचं चित्र बदललं, मुंबईला मोठा झटका, नंबर 1 कोण?
Gujarat Titans vs Delhi Capitals IPL 2026Image Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 09, 2026 | 3:43 AM
Share

गुजरात टायटन्सने दिल्ली कॅपिट्ल्सवर आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 14 व्या सामन्यात बुधवारी 8 एप्रिलला शेवटच्या चेंडूवर 1 धावेने सनसनाटी विजय मिळवला. गुजरातने यासह विजयाचं खातं उघडलं. तर दिल्लीने जिंकलेला सामना गमावला. दिल्लीला हा सामना जिंकून विजयी हॅट्रिक करण्याची सुवर्णसंधी होती. दिल्लीने जवळपास सामना जिंकलाच होता. मात्र शेवटच्या चेंडूवर गेम फिरला आणि गुजरातने दिल्लीवर 1 धावेने सनसनाटी विजय मिळवला. या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कोणती टीम कोणत्या स्थानी पोहचली आहे? हे जाणून घेऊयात.

सामन्याबाबत थोडक्यात

गुजरातने दिल्लीसमोर 211 धावांचं आव्हान ठेवलं होतं. दिल्लीने या धावांचा शेवटपर्यंत जबरदस्त पाठलाग केला. मात्र दिल्ली शेवटच्या चेंडूवर अपयशी ठरली. दिल्ली शेवटच्या चेंडूत 2 धावा करण्यात अपयशी ठरली. दिल्लीची यासह विजयाची हॅट्रिक हुकली. दिल्लीने याआधी मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्सला पराभूत केलं होतं.

पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे?

गुजरातला विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये मोठा फायदा झाला आहे. गुजरातने 2 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये 3 स्थानांची झेप घेतली आहे. जीटीने 3 सामन्यांत 1 विजय मिळवला आहे. जीटीचा नेट रनरेट हा -0.270 असा आहे. गुजरात या विजयासह सहाव्या स्थानी विराजमान झाली आहे.  गुजरात या सामन्याआधी पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानी होती. तर गुजरातचा नेट रनरेट हा -0.424 असा होता. या विजयामुळे गुजरातच्या नेट रनरेटमध्ये सुधार झाला आहे. गुजरात 19 व्या मोसमात विजय मिळवणारी एकूण आठवी टीम ठरली. तर अद्याप कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्स पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहेत. तसेच गुजरातच्या विजयामुळे मुंबईची आठव्या स्थानी घसरण झाली आहे. मुंबई  त्याआधी सातव्या स्थानी होती.  तर केकेआर नवव्या आणि सीएसके दहाव्या स्थानी आहे.

दिल्लीची मोठी संधी हुकली

दिल्लीला गुजरात विरुद्ध जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी झेप घेण्याची संधी होती. मात्र डेव्हीड मिलर  याच्या एका चुकीमुळे विजयाचं रुपांतर झटक्यात पराभवात झालं. दिल्लीचा हा या मोसमातील पहिला पराभव ठरला. ताज्या आकडेवारीनुसार, दिल्ली पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानी विराजमान आहे. दिल्लीने 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. दिल्लीचा नेट रनरेट हा +0.811 असा आहे. दिल्लीचा नेट रनरेट गुजरात विरूद्धच्या सामन्याआधी +1.170 असा होता.

गुरुवारी केकेआर विरुद्ध लखनौ सामना

दरम्यान गुरुवारी 9 एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स अशी लढत होणार आहे. केकेआरचा हा सामना जिंकून विजयाचं खातं उघडण्याचा प्रयत्न असणार आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?