AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 Points Table : मु्ंबईची मोठ्या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये झेप, तिघांना फटका

IPL 2026 Points Table : गुजरात टायटन्सला मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानात मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईचा अहमदाबादमधील हा गुजरात विरुद्धचा पहिलाच विजय ठरला. मुंबईला या विजयामुळे पॉइंट्स टेबलमध्ये मोठा फायदा झाला आहे.

IPL 2026 Points Table : मु्ंबईची मोठ्या विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये झेप, तिघांना फटका
Hardik Pandya and Ashwani Kumar GT vs MI IPL 2026Image Credit source: PTI
| Updated on: Apr 21, 2026 | 5:19 AM
Share

मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सवर सोमवारी 20 एप्रिलला 99 धावांनी एकतर्फी विजय मिळवला. मुंबईचा हा 19 व्या मोसमातील (IPL 2026) एकूण दुसरा विजय ठरला. मुंबई या मोसमात धावांबाबत मोठा विजय मिळवणारी पहिली टीम ठरली. मुंबईला या मोठ्या फरकाने विजय मिळवल्याचा पॉइंट्स टेबलमध्ये फायदा झाला आहे. मुंबईने पॉइंट्स टेबलमध्ये थेट 3 स्थानांची झेप घेतली आहे. या निमित्ताने 19 व्या मोसमातील 30 व्या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कोणती टीम कितव्या स्थानी आहे हे जाणून घेऊयात.

सामन्याचा धावता आढावा

मुंबईने तिलक वर्मा याने केलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर गुजरातसमोर 200 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र अश्वनी कुमार याने 4 विकेट्स घेतल्या. तर इतर सहकाऱ्यांनी उल्लेखनीय बॉलिंग करत गुजरातचा डाव हा 15.5 ओव्हरमध्ये 100 धावांवर आटोपला. गुजरातची ही आयपीएल इतिहासातील दुसरी निच्चांकी धावसंख्या ठरली. तसेच गुजरातचा हा धावांबाबत सर्वात मोठा पराभव ठरला. मुंबई 99 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकली. त्यामुळे मुंबईला नेट रनरेटमध्ये तगडा फायदा झाला आहे. या सामन्यानंतर पॉइंट्सटेबलध्ये कोणता संघ कोणत्या स्थानी आहे हे जाणून घेऊयात.

गुजरात विरुद्ध मुंबई सामन्याच्या निकालाचा पॉइंट्स टेबलमधील टॉप 5 मध्ये काहीही बदल झालेला नाही. पंजाब पहिल्या स्थानी कायम आहे. आरसीबी दुसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थान तिसऱ्या स्थानी आहे. हैदराबाद आणि दिल्ली अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत. गुजरात मुंबई विरूद्धच्या पराभवानंतरही पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानी कायम आहे.

मुंबईची मोठी झेप

मुंबईला 99 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवल्याने नेट रनरेटमध्ये जबरदस्त असा फायदा झाला आहे. मुंबईने 4 गुणांसह थेट दहाव्या क्रमांकावरुन सातव्या स्थानी झेप घेतलीय. मुंबईने केकेआर, लखनौ आणि चेन्नईला मागे टाकलं आहे. मुंबईचा या विजयासह नेट रनरेट हा +0.067 असा आहे जो सामन्याआधी -1.076 इतका होता.

मंगळवारी कुणाचा सामना?

दरम्यान मंगळवारी 21 एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने असणार आहेत. उभयसंघातील सामना हा हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये होणार आहे. दोन्ही संघांकडे विजय मिळवून पॉइंट्स टेबलमधील टॉप 3 मध्ये पोहचण्याची संधी आहे. आता दोघांपैकी कोणता संघ यशस्वी ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली.

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा.

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?

कॅन्सर झाला, लवकर वर जाणार… टक्कल केल्यानंतर अफवांमुळे महेश मांजरेकरांकडे रडत गेली अभिनेत्री.

कॅन्सर झाला, लवकर वर जाणार… टक्कल केल्यानंतर अफवांमुळे महेश मांजरेकरांकडे रडत गेली अभिनेत्री