AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: आरसीबीचं प्लेऑफचं गणित सुटलं, पण पुढच्या दोन सामन्यात कोणाचा रस्ता अडवणार? जाणून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेचं प्लेऑफचं चित्र हळूहळू स्पष्ट होत आहे. स्पर्धेत आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांना 16 गुण मिळाले असून त्याची प्लेऑफची जागा पक्की झाली आहे. असं असताना उर्वरित दोन सामन्यात आरसीबी कोणाचा मार्ग अडवेल? जाणून घ्या.

IPL 2026: आरसीबीचं प्लेऑफचं गणित सुटलं, पण पुढच्या दोन सामन्यात कोणाचा रस्ता अडवणार? जाणून घ्या
IPL 2026: आरसीबीचं प्लेऑफचं गणित सुटलं, पण पुढच्या दोन सामन्यात कोणाचा रस्ता अडवणार? जाणून घ्याImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 14, 2026 | 7:55 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 12 सामन्यांचा खेळ खेळत 16 गुणांची कमाई केली आहे. 12 पैकी आठ सामन्यात विजय, तर चार सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. आता आरसीबीकडे 16 गुण असून नेट रनरेट हा +1.053 इतका आहे. त्यामुळे अव्वल स्थानी झेप घेतली आहे. मात्र टॉप 2 मध्ये स्थान कायम ठेवण्याचं आव्हान आरसीबीपुढे आहे. त्यामुळे उर्वरित दोन सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. कारण टॉप 2 मध्ये असलेल्या संघांना अंतिम फेरी गाठण्यासाठी दोन संधी मिळतात. त्यामुळे टॉप 2 मध्ये जागा मिळण्याचा प्रयत्न आरसीबीचा असणार आहे. त्यामुळे उर्वरित दोन सामन्यातही विजय मिळवण्यासाठी धडपड असणार आहे. आरसीबीचा प्लेऑफमधील स्थान पक्कं झालं असलं तरी त्याला अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे आरसीबीला या दोन सामन्यांपैकी किमान एक सामना जिंकावाच लागेल. तरच त्यांच्यासाठी प्लेऑफचा मार्ग मोकळा होईल.

आरसीबीचा पुढचा सामना कोणाशी?

आरसीबी आपले पुढील दोन लीग सामने घरच्या मैदानाबाहेर असणार आहेत. पहिला सामना 17 मे रोजी गेल्या वर्षीच्या अंतिम सामन्यातील प्रतिस्पर्धी पंजाब किंग्सविरुद्ध, तर शेवटचा लीग सामना 22 मे रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होईल. हे दोन्ही संघ सध्या स्पर्धेत उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत आणि त्यांना हरवणे आरसीबीसाठी एक आव्हान असेल. कारण प्रतिस्पर्धी संघांना त्यांच्या घरच्या मैदानावर हरवणं वाटते तितकं सोपं नाही. प्ले-ऑफच्या दृष्टिकोनातून आरसीबीचे प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन संघांसाठीही आरसीबीविरुद्धचा विजय अत्यावश्यक आहे. त्यामुळे आरसीबीला टॉप 2 मधलं स्थान मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. कारण या दोन्ही संघासाठी करो या मरोची लढाई असणार आहे.

पंजाब किंग्सचे लीग टप्प्यात अजून 3 सामने बाकी आहेत. पंजाब सध्या सहा विजयांसह 13 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे प्लेऑफमधील आपले स्थान निश्चित करण्यासाठी पंजाबला उर्वरित सामने जिंकणे आवश्यक आहे. लीग टप्प्यात सनरायझर्सचे आणखी दोन सामने बाकी आहेत. त्यापैकी एक सामना आरसीबीविरुद्ध असेल. आरसीबीविरुद्ध जिंकण्याव्यतिरिक्त, सनरायझर्सला आणखी एक सामना जिंकणे आवश्यक आहे.

Follow Us
आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं...
Nitin Gadkatri : आता मी जास्त वेळ... भर मंचावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं विधान, चक्क...
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालक..
कांदिवलीतील मारहाण घटनेवर प्रताप सरनाईकांची तीव्र नाराजी; रिक्षाचालकाला थेट...
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत,
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जारांगे आक्रमक; मंत्री उदय सामंत, शंभुराज देसाई घेणार भेट
तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange : तर तुमचं राजकीय करिअर संपेल! मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत...
माझगावमध्ये मोरया गणपती मिरवणुकीत गोंधळ, अंडी फेकल्याच्या आरोपाबाबत मोठी अपडेट समोर
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला..
मराठी सक्तीवरून प्रकरण पेटलं! अमराठी रिक्षा चालकाकडून मराठी भाषिकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन,
कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा चालकांचे आंदोलन, वाहतूक ठप्प
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक? आज...
शिवसेना कुणाची? आठ दिवसांचा युक्तिवाद शिवसेनेसाठी निर्णायक... अगामी सुनावणीआधीच वकीलांनी असं काय सांगितलं?
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... लक्ष्मण हाके Video
माझ्याकडे 90 टक्के रिस्पॉन्स आहे, पण मी आबांना... पुन्हा लक्ष्मण हाकेच्या घरातील व्हिडीओ व्हायरल
शिंदेंकडून गणेशोत्सव तर ठाकरेंकडून ईदच्या शुभेच्छा,'मातोश्री' बाहेर...
शिंदे गटाकडून गणेशोत्सव तर ठाकरे गटाकडून ईदच्या शुभेच्छा, 'मातोश्री' बाहेरील त्या बॅनरर्सची तुफान चर्चा