AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Suryavanshi: जर असाच खेळत राहिलो तर… LSG विरोधात वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशीची मोठी घोषणा… वक्तव्याने सोशल मीडियावर तुफान

Vaibhav Suryavanshi Statement: राजस्थान रॉयल्सचा दमदार खेळाडू वैभव सूर्यवंशीने लखनऊ सुपर जायंटसविरोधात जबरदस्त खेळी खेळली. 38 चेंडूत त्याने 93 धावा काढल्या. प्लेअर ऑफ द मॅच जिंकल्यानंतर त्याने मोठे वक्तव्य केले आहे.

Vaibhav Suryavanshi: जर असाच खेळत राहिलो तर... LSG विरोधात वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशीची मोठी घोषणा... वक्तव्याने सोशल मीडियावर तुफान
वैभव सूर्यवंशीImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 21, 2026 | 10:56 AM
Share

Vaibhav Suryavanshi Statement: राजस्थान रॉयल्सचा तडाखेबाज खेळाडू वैभव सूर्यवंशी याने गोलंदाजाचा घामाटा काढला आहे. त्याने आयपीएल 2026 च्या 64 व्या सामन्यात कमाल दाखवली. त्याच्या फलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जायंट्स (LSG) विरोधात 221 धावांचे लक्ष्य सहज गाठले. त्याने 38 चेंडूवर 93 धावा चोपल्या. त्याच्या तुफान खेळीने प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. वैभवने 10 गगनचुंबी षटकार आणि 7 चौकार ठोकले. पण शतकी खेळी त्याला खेळता आली नाही. पण बाद होण्यापूर्वीच त्याने राजस्थान रॉयल्सचा विजय पक्का केला.

वैभव सूर्यवंशी म्हणाला काय?

वैभवने आयपीएलमध्ये तिसरे’प्लेअर ऑफ द मॅच’ पारितोषक मिळवले. त्यावेळी त्याने त्याच्या खेळीविषयी माहिती दिली. धावांचा मोठा डोंगर उभा होता. त्यामुळे कोणतीही घाई न करता खेळायचं हे अगोदरच निश्चित केले होते. थोडा वेळ घेऊन खेळण्याचे ठरवले होते. जास्त वेळ धावपट्टीवर थांबल्यास दुसऱ्या फलंदाजालाही त्याचा फायदा होईल, असा विचार मैदानात येण्यापूर्वी केल्याचे वैभवने सांगितले. वैभव कालच्या सामन्यात शतकी खेळी करू शकला नाही याची खंत त्याच्या चाहत्यांना आहे.

आल्या आल्याच का नाही ठोकले षटकार?

सुरुवातीला वैभव सूर्यवंशीने अत्यंत संयमीत खेळी खेळली. त्याने एका टप्प्यानंतर खेळी बदलली आणि झटपट अर्धशतक पूर्ण केले. त्याविषयी त्याने महत्त्वाची माहिती दिली. आपण कधीही दोन अथवा तीन षटकार सहज ठोकू शकतो याचा मला विश्वास होता. पण तरीही मी संयमाने खेळलो. मला घाई करून विकेट द्यायची नव्हती. दीर्घकाळ धावपट्टीवर टिकून राहायचे होते असे मनोगत त्याने व्यक्त केले.

तर दीर्घकाळ खेळत राहिल

कमी वयात इतकी लोकप्रियता मिळवल्याबद्दल त्याला प्रश्न विचारण्यात आला. मी या गोष्टीकडे फार लक्ष देत नाही. मी वृत्तपत्र वाचत नाही. मी लोकप्रियता अथवा इतर गोष्टींचा फार विचार करत नाही. मला वाटतं की आता कुठे माझी सुरुवात झाली आहे. जर माझी कारकीर्द दीर्घकाळ राहिली तर मी अधिक काळ खेळत राहिल. तेव्हा सुद्धा लोक माझ्याविषयी काही ना काही चर्चा करतीलच. त्यामुळे मी माझ्या खेळावर लक्ष्य देतो. कारण मला माझा प्रवास पूर्ण करायचा आहे, असे वैभव सूर्यवंशी म्हणाला. वैभव याला क्रिकेट जगतात मोठी खेळी खेळायचे असल्याचे या वक्तव्यावरून दिसून येते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...