RCB vs GT Toss : गुजरातचा फायनलमध्ये मोठा निर्णय, आरसीबी विरुद्ध ऑलराउंडरची एन्ट्री
Royal Challengers Bengaluru vs Gujarat Titans Final Toss and Playing 11 : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होम टीम गुजरात टायटन्स विरुद्ध नाणेफेकीचा कौल लागला आहे. गतविजेत्या आरसीबीने या सामन्यात चेजिंगचा निर्णय केला आहे.

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील अंतिम सामन्यात (IPL 2026 Final) गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स (RCB vs GT Final) आमनेसामने आहेत. सामन्याचं आयोजन हे अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. गतविजेत्या आरसीबीच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. कर्णधार रजत पाटीदार याने फिल्डिंगचा निर्णय घेत शुबमन गिल याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
गुजरातकडून 1 बदल
आरसीबीने महाअंतिम सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आरसीबीने आपल्या त्याच प्लेइंग ईलेव्हनसह खेळण्याचा निर्णय घेतला आहे. तर गुजरातने एकमेव बदल केला आहे. आर साई किशोर याच्या जागी बॉलिंग ऑलराउंडर अर्शद खान याचं कमबॅक झालं आहे.
अहमदाबादमधील आकडेवारी काय सांगते?
आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात अहमदाबादमध्ये आतापर्यंत एकूण 7 सामने खेळवण्यात आले आहेत. या 7 पैकी 4 सामन्यांत पहिले बॅटिंग करणारी टीम जिंकली आहे. तर 3 वेळा चेज करणारी टीम विजयी झाली आहे.
आरसीबी-गुजरात पहिल्यांदाच फायनलमध्ये आमनेसामने
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध गुजरात टायटन्स दोन्ही संघ अंतिम फेरीत आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच आरसीबीची फायनलमध्ये पोहचण्याची पाचवी आणि गुजरातची तिसरी वेळ आहे. दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली आहे. त्यामुळे दोघांपैकी कोणता संघ दुसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवणार? याची चाहत्यांना प्रतिक्षा असणार आहे.
कॅप्टन रजत आणि शुबमनची आकडेवारी
शुबमन गिल याने गुजरात टायटन्सचं आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत एकूण 42 सामन्यांत नेतृत्व केलं आहे. शुबमनने या 42 पैकी 24 सामन्यांत गुजरातला विजयी केलं आहे. तर गुजरातला 18 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.
तसेच रजत पाटीदार याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचं नेतृत्व करण्याची 28 वी वेळ ठरली आहे. रजतने याआधी आरसीबीला 27 पैकी 19 सामन्यांत विजयी केलं आहे. तर आरसीबीला 8 वेळा पराभूत व्हावं लागलं आहे.
गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन : साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, निशांत सिंधू, जेसन होल्डर, रशीद खान, कगिसो रबाडा, अर्शद खान आणि मोहम्मद सिराज.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग ईलेव्हन: विराट कोहली, देवदत्त पडीक्कल, रजत पाटीदार (कॅप्टन), जितेश शर्मा (विकेटकीपर), टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, रोमारियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी, जोश हेझलवूड आणि रसिक सलाम दार.