AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : कोलकाता नाईट रायडर्सचा मोठा निर्णय, जर्सी नंबर 12 बाबत अशी घोषणा

Andre Russell jersey : आंद्रे रसेल याने केकेआर टीमला अनेक सामन्यांमध्ये बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावर एकहाती विजय मिळवून दिला आहे. रसेच्या या योगदानसाठी केकेआर टीमने त्याचा मोठा सन्मान केला आहे.

IPL 2026 : कोलकाता नाईट रायडर्सचा मोठा निर्णय, जर्सी नंबर 12 बाबत अशी घोषणा
Andre Russell KKR IPLImage Credit source: AFP
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 25, 2026 | 3:52 AM
Share

ऑलराउंडर आंद्रे रसेल याने आपल्या बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावर जगातील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत लीग असलेल्या आयपीएल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलीय. रसेलने केकेआर अर्थात कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना गेल्या काही मोसमात धमाका केला. या अशा अप्रतिम कामगिरीनंतर आंद्रेने आयपीएलमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. टीमसाठी बहुमूल्य योगदान देणाऱ्या आंद्रेसाठी केकेआरने 19 व्या मोसमासाआधी मोठा निर्णय घेतला आहे. केकेआरने जर्सी नंबर 12 कायम रिटायर केली आहे. अर्थात यापुढे कोणत्याही केकेआरच्या खेळाडूला जर्सी नंबर 12 वापरता येणार नाही. रसेलच्या सन्मानासाठी केकेआरने हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. केकेआरने प्री सिजन नाईट्स अनप्लग्ड 3.0 दरम्यान आंद्रे रसेलच्या जर्सी नंबर 12 बाबत हा निर्णय घेतला.

आंद्रे रसेची आयपीएलमधून निवृत्ती

आंद्रे रसेल याला आयपीएलच्या 18 व्या मोसमात (IPL 2025) काही खास करता आलं नाही. त्यामुळे केकेआरेने रसेलला रिलीज अर्थात करारमुक्त केलं. त्यानंतर रसेलने नोव्हेंबरमध्ये आयपीएलमधून निवृत्ती घेतल्याचं जाहीर केलं. मात्र त्यानंतरही रसेल केकेआरचा भाग असणार आहे. रसेल कोचिंग स्टाफमध्ये आपलं योगदान देणार आहे.

केकेआरचं 12 वर्ष प्रतिनिधित्व

रसेलने केकेआरचं 12 वर्ष प्रतिनिधित्व केलं. रसेलने 2014 ते 2025 दरम्यान उल्लेखनीय कामगिरी केली. रसेल या दरम्यान एकूण 140 सामने खेळला. रेसलने या 140 सामन्यांमध्ये बॅटिंगसह बॉलिंगनेही योगदान दिलं. रसेलने 2 हजार 651 धावा केल्या. तसेच रसेलने 23 विकेट्सही मिळवल्या.

जर्सी नंबर 12 निवृत्त

केकेआरने एकूण 3 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. रसेल त्यापैकी 2 वेळा विजेत्या संघाचा भाग होता. रसेलने केकेआरला 2014 आणि 2024 मध्ये आयपीएल ट्रॉफी मिळवून देण्यात प्रमुख भूमिका बजावली. रसेलने 2019 साली उल्लेखनीय कामगिरी केली होती. रसेलच्या या कामगिरीची दखल घेत त्याला ‘Most Valuble Player’ या पुरस्कारने गौरवण्यात आलं.

अजिंक्य कर्णधार-रिंकु उपकर्णधार

केकेआरने प्री सिजन नाईट्स अनप्लग्ड 3.0 दरम्यान आणखी एक मोठी घोषणा केली. टीमचा अनुभवी फलंदाज आणि स्टार फिनिशर रिंकु सिंह याला मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. रिंकूला केकेआरचा उपकर्णधार करण्यात आलं आहे.

केकेआरचा पहिला सामना कधी आणि कुठे?

दरम्यान केकेआर या 19 व्या मोसमातील आपला पहिला सामना हा 29 मार्चला खेळणार आहे. केकेआरसमोर या पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्सचं आव्हान असणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडिममध्ये होणार आहे.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट