AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH vs RCB : हैदराबादकडून आरसीबीचा करेक्ट कार्यक्रम, ऑरेंज आर्मीचा 55 धावांनी विजय, बंगळुरुची मोठी संधी हुकली

Sunrisers Hyderabad vs Royal Challengers Bengaluru Match Result, IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडे हैदराबादला पराभूत करुन 19 व्या मोसमात आपला दहावा विजय मिळवण्याची संधी होती. मात्र हैदराबादने आरसीबीला विजयी होण्यापासून रोखलं आणि 2 गुणांची कमाई केली.

SRH vs RCB : हैदराबादकडून आरसीबीचा करेक्ट कार्यक्रम, ऑरेंज आर्मीचा 55 धावांनी विजय, बंगळुरुची मोठी संधी हुकली
Pat Cummins SRH vs RCB IPL 2026Image Credit source: Bcci
| Updated on: May 23, 2026 | 3:03 AM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 67 व्या सामन्याचा निकाल समोर आला आहे. पॅट कमिन्स याच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबादने शुक्रवारी 22 मे रोजी आपल्या घरच्या मदैानात राजीव गांधी स्टेडियममध्ये गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा  एकतर्फी फरकाने धुव्वा उडवला आहे. हैदराबादने बंगळुरुसमोर 256 रन्सचं तगडं आव्हान ठेवलं होतं. मात्र बंगळुरुला 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 200 रन्सपर्यंतच पोहचता आलं. हैदराबादने यासह 55 धावांनी विजय मिळवला. हैदराबाद अशाप्रकारे आपला साखळी फेरीतील शेवटचा सामना जिंकण्यात यशस्वी ठरली. हैदराबादचा हा नववा विजय ठरला. तर आरसीबीला साखळी फेरीचा शेवट विजयाने करण्यात अपयश आलं. आरसीबीला हा सामना जिंकून 10 व्या विजयाची नोंद करण्याची संधी होती. मात्र आरसीबीची ही संधी हुकली.

हैदराबादकडून आरसीबीचा हिशोब

हैदराबादला प्लेऑफच्या हिशोबाने टॉप 2 मध्ये राहण्यासाठी हा सामना मोठ्या फरकाने जिंकण्याची गरज होती. मात्र हैदराबाद तसं करण्यात अपयशी ठरली. त्यामुळे हैदराबाद सामन्यादरम्यानच टॉप 2 मध्ये आपल्या मोहिमेचा शेवट करण्यात अपयशी ठरल्याचं स्पष्ट झालं. मात्र हैदराबादने सामना जिंकला आणि आरसीबी विरूद्धच्या गेल्या पराभवाची परतफेड केली. दोन्ही संघ 19 व्या मोसमात याआधी 28 मार्च रोजी आमनेसामने आले होते. तेव्हा आरसीबीने हैदराबादवर 6 विकेट्सने विजय मिळवला होता.

सामन्यात काय झालं?

हैदराबादने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 255 धावा केल्या. हैदराबादसाठी इशान किशन याने सर्वाधिक 79 धावा केल्या. ओपनर अभिषेक शर्मा याने 56 रन्स जोडल्या. तर हेन्रिक क्लासेन याने 51 धावा केल्या. तसेच इतरांनीही योगदान दिलं. आरसीबीसाठी रसीख समान डार याने सर्वाधिक 2 विकेट्स मिळवल्या.

स्कोअरकार्ड

आरसीबीची बॅटिंग

आरसीबीसाठी एकूण 6 फलंदाजांनी बॅटिंग केली. आरसीबीसाठी कॅप्टन रजत पाटीदार याने सर्वाधिक 56 धावा केल्या. ओपनर वेंकटेश अय्यर याने 44 धावांचं योगदान दिलं. देवदत्त पडीक्कल याने 21 रन्स केल्या. विराट कोहली याला 15 धावाच करता आल्या. तर कृणाल पंड्या आणि टीम डेव्हिड हे दोघे नाबाद परतले. कृणालने 41 आणि टीमने 15 धावांचं योगदान दिलं. हैदराबादसाठी एशान मलिंगा याने 2 विकेट्स घेतल्या. तर साकीब हुसैन आणि ट्रॅव्हीस हेड या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...