Virat Kohli : विराट भाऊ आला रे…IPL साठी किंग कोहली दाखल, दिमाखदार एन्ट्री पाहून व्हाल थक्क!

किंग कोहलीची एन्ट्री अखेर झाली आहे. तो बंगळुरूच्या संघात दाखल झाला आहे. आता तो 28 मार्च रोजीच्या पहिल्याच सामन्यात क्रिकेट खेळताना दिसणार आहे. त्याच्या चाहत्यांना तो फलंदाजी करताना दिसेल.

Virat Kohli : विराट भाऊ आला रे...IPL साठी किंग कोहली दाखल, दिमाखदार एन्ट्री पाहून व्हाल थक्क!
virat kohli in ipl
Image Credit source: एक्स, टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 18, 2026 | 8:10 PM

Virat Kohli, IPL 2026: येत्या 28 मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. या हंगामातील पहिलाच सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. या सामन्याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. दरम्यान, या हंगामात खेळण्यासाठी सर्वच खेळाडू आपापल्या टीमच्या ताफ्यात दाखल होत आहेत. भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली हा सरनायझर्स हैदराबाद संघाकडून खेळतो. तोदेखील संघात नेमका कधी सामील होणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. असे असतानाच आता मोठी माहिती समोर आली आहे. किंग कोहली आता बंगळुरू संघात सामील झाला असून तशी माहिती रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सोशल मीडिया खात्यावर शेअर करण्यात आला आहे.

विराट आला रे…

विराट कोहली बंगळुरूच्या संघात सामील झाला आहे. बंगळुरू संघाने नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये विराट कोहली विमानतळावर आल्याचे दिसत आहे. या व्हिडीओत त्याचा चेहरा दाखवण्यात आलेला नाही. परंतु विराटच्या हातात एक महागडे घड्याळ दिसत आहे. सोबतच डोळ्यावर गॉगल परिधान केलेला अस्पष्टपणे विराट पाहायला मिळत आहे. एका ठिकाणी विराट कोहली गाडीमध्ये बसताना दिसत आहे. त्याला पाहण्यासाठी, त्याचे फोटो काढण्यासाठी विमानतळावर लोकांची झालेली गर्दीदेखील दाखवलेली आहे.

2025 सालच्या हंगामात विराटची कामगिरी काय होती?

दरम्यान, येत्या 28 मार्च रोजी म्हणजेच शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात पहिला सामना होणार आहे. बंगळुरूच्या के एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. याच सामन्यात विराट कोहलीदेखील फलंदाजी करताना दिसेल. याआधीच्या हंगामात विराटने दमदार कामगिरी केली गोती. त्याने 15 सामन्यांत 54.75 च्या सरासरीने तसेच 144.71 च्या स्ट्राईक रेटने 657 धावा केल्या होत्या. त्याने 2025 सालच्या आयपीएलमध्ये 8 अर्धशतक केले होते. त्या हंगामात त्याने सर्वाधिक 73 धावा केल्या होत्या.

Follow Us