MS Dhoni : शेवटी लेक ती लेक! IPL फायनलवेळी माहीच्या मुलीचा तो फोटो व्हायरल

MS dhoni Daughter Ziva : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममधील सर्व चाहत्यांनी श्वास रोखून धरला होता. अशातच आता धोनीची मुलगी झिवाचा एक फोटो व्हायरल होत आहे.

MS Dhoni : शेवटी लेक ती लेक! IPL फायनलवेळी माहीच्या मुलीचा तो फोटो व्हायरल
| Updated on: Jun 05, 2023 | 11:39 PM

मुंबई : आयपीएल 2023 च्या फायनल सामन्यामध्ये शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या या सामन्यात कोण जिंकेल काही सांगता येत नव्हतं. मोहित शर्माने ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती त्यावरून तरी सीएसके जिंकेल असं काही वाटत नव्हतं. मात्र रविंद्र जडेजाने शेवटच्या दोन चेंडूत षटकार आणि चौकार मारत संघाला विजय मिळवून दिला होता. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये फायनलला शेवटच्या चेंडूवेळी सर्व चाहत्यांनी श्वास रोखून धरला होता. तशाच प्रकारचा आता धोनीची मुलगी झिवाचा एक फोटो व्हायरल होत आहे.

झिवाचा फोटो होत आहे व्हायरल

आयपीएल 2023 मध्ये चेन्नई सुपर किंग्जच्या शानदार विजयानंतर झिवा धोनीही ट्रॉफीसोबत दिसला. अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तो एका बाजूला आयपीएल ट्रॉफी हातात धरून असल्याचे दिसून येत आहे.

अत्यंत रोमांचक झालेल्या या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवला. चेन्नई सुपर किंग्जला शेवटच्या षटकात 13 धावांची गरज होती. गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहित शर्माने पहिल्या चार चेंडूंमध्ये उत्कृष्ट यॉर्कर टाकला आणि केवळ तीन धावा दिल्या होत्या.  यानंतर शेवटच्या दोन चेंडूंवर 10 धावा करायच्या होत्या. CSK कॅम्प आणि चाहत्यांमध्ये निराशा होती. जडेजाने पाचव्या चेंडूवर षटकार ठोकला त्यानंतर चौकार त्यावेळी सीएसकेच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.

दरम्यान, या विजयासह सीएसके संघाने आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा विजेतेपद जिंकण्याचा पराक्रम केला आहे. मुंबई इंडिअन्सने पाचवेळा विजेतेपद जिंकलं होतं, या विक्रमाशी सीएसकेने आता बरोबरी केली.