Health : पायाच्या तळव्यांना तुपाने मसाज केल्याचे आहेत आरोग्यदायी फायदे, ॲसिडीटी, अपचन….

तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. पायाच्या तळव्यामुळे तुमच्या चेहर्‍यावर ग्लो येण्यास मदत होते. आता ते कसं? जाणून घ्या.

Health : पायाच्या तळव्यांना तुपाने मसाज केल्याचे आहेत आरोग्यदायी फायदे, ॲसिडीटी, अपचन....
Follow us
| Updated on: Jun 05, 2023 | 10:36 PM

हेल्थ : बहुतेक लोक त्वचा सुंदर आणि फ्रेश आणि टवटवीत दिसण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय करताना दिसतात. पण वेगवेगळे उपाय करूनही हवा तसा ग्लो मिळत नाही. पण तुम्हाला माहितीये का की आपल्या पायाच्या तळव्यांचं आणि चेहर्‍याचं खास कनेक्शन आहे. होय तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. पायाच्या तळव्यामुळे तुमच्या चेहर्‍यावर ग्लो येण्यास मदत होते. आता ते कसं? याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

अनेक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पायाच्या तळव्यांना तुपाने मालिश केली तर चेहर्‍यावर जबरदस्त ग्लो येतो. हा एक आयुर्वेदिक उपचार असून हा केल्यास फक्त स्किनलाच फायदा होत नाही तर अनेक शारीरिक समस्याही दूर होतात.

पायाच्या तळव्यांना तुप लावण्याचे फायदे

1. तळव्यांना तुपाने मालिश केल्यानंतर चेहर्‍यावर ग्लो येतो. सोबतच स्किन संदर्भातील अनेक समस्या दूर होतात.

2. ज्या लोकांना रात्री नीट झोप लागत नाही अशा लोकांनी पायाच्या तळव्यांना तुप लावून मालिश करावी. यामुळे तुम्हाला नक्कीच शांत झोप लागेल.

3. जर तुमचा पार्टनर तुमच्या शेजारी झोपल्यानंतर मोठमोठ्याने घोरत असेल तर आजपासूनच त्याच्या पायाला तुपाने मालिश करा.

4. ज्या लोकांना ॲसिडीटी, अपचन आणि गॅससारख्या समस्या असतील तर अशा लोकांनी हा उपाय नक्कीच अवलंबवावा.

5. जर तुम्ही दररोज झोपण्याअगोदर पायाला तूप लावत असाल तर तुमचा तणाव दूर होईल आणि तुमच्या मनाला शांती मिळेल.

कशी कराल पायाला तुपाची मालिश?

एका वाटीत तूप घ्या आणि ते तूप तुमच्या पायाला लावा. त्यानंतर तुमचे पाय गरम होईपर्यंत तुपाने मालिश करत रहा, त्यानंतर निवांत झोपा. काही दिवस हा उपाय सातत्याने करत राहिला तर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.

तूप हे महाग असते, त्यामुळे आपण रोज तुपाचा वापर मालिश करण्यासाठी करू शकत नाही. त्यामुळे तुपाऐवजी तुम्ही कोकोनट ऑइल किंवा कोकम बटरचा देखील वापर करू शकता.

(Disclaimer : येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. TV9 याची पुष्ठ करत नाही)

Non Stop LIVE Update
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.