IPL 2024 Orange Cap: ऑरेंज कॅपच्या शर्यतीत शतकासह रोहित शर्माची एन्ट्री, वाचा गुणतालिकेत कोण कुठे

IPL 2024 Orange Cap, Highest run scorer : आयपीएल स्पर्धेत आता ऑरेंज कॅपची शर्यत आणखी चुरशीची होणार असंच दिसत आहे. विराट कोहली मुंबई इंडियन्सविरुद्ध स्वस्तात बाद झाल्याने इतर फलंदाजांना ऑरेंज कॅपचं स्वप्न पडू लागलं आहे. गुणतालिकेत आता कोण कुठे ते जाणून घ्या

IPL 2024 Orange Cap:  ऑरेंज कॅपच्या शर्यतीत शतकासह रोहित शर्माची एन्ट्री, वाचा गुणतालिकेत कोण कुठे
Follow us
| Updated on: Apr 15, 2024 | 2:14 AM

आयपीएल स्पर्धेत षटकार आणि चौकारांचा वर्षाव होत असतो. खरं तर या फॉर्मेटमध्ये गोलंदाजांची तशी काही खैर नसते. फलंदाजांना पूर्णपणे गोलंदाजांची धुलाई करण्याची संधी असते. त्यामुळे या स्पर्धेत कोण सर्वाधिक धावा करतो याची एक वेगळीच शर्यत पाहायला मिळते. स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून ही शर्यत सुरु झाली आहे. कधी कोण अव्वल स्थानी, तर कधी टॉप पाचमधून थेट बाहेर पडावं लागतं. पण गेल्या काही सामन्यांपासून ऑरेंज कॅपचा मान रनमशिन्स विराट कोहलीच्या डोक्यावर आहे. शतकी खेळीनंतर ही स्पर्धा गेल्या काही दिवसांपासून एकतर्फी झाली आहे. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद सामन्यात विराट कोहली किती धावा करतो यावर पुढची शर्यत ठरणार आहे. जर विराट कोहली स्वस्तात बाद झाला तर मात्र ही शर्यत चुरशीची होईल.

विराट कोहलीने सहा सामन्यात 319 धावा केल्या आहेत. यात नाबाद 113 ही सर्वोत्तम खेळी आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्सचा रियान पराग आहे. त्याने सहा सामन्यात 284 धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन असून त्याने 264 धावा केल्या आहेत. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल या शर्यतीत चौथ्या स्थानावर आहे. त्याने 255 धावा केल्या आहेत. तर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्यात रोहित शर्माने शतकी खेळी केली आणि पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. रोहित शर्माच्या एकूण 243 धावा झाल्या आहेत. दुसरीकडे, शिवम दुबेने जबरदस्त खेळी केली. त्याने नाबाद 66 धावांची खेळी केली. यासह त्याच्या नावावर 242 धावा असून सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे.

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 4 गडी गमवून 206 धावा केल्या आणि विजयासाठी 207 धावांचं आव्हान दिलं. मात्र मुंबई इंडियन्सला हे आव्हान गाठता आलं नाही.  मुंबई इंडियन्सला 20 षटकात 6 गडी गमवून 186 धावा करता आल्या. पण विजयासाठी 20 धावा कमी पडल्या आणि पराभव झाला.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमॅरियो शेफर्ड, श्रेयस गोपाल, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह आणि आकाश मधवाल.

चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे आणि मुस्तफिजुर रहमान.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.