IPL 2024 Orange Cap: ऑरेंज कॅपच्या शर्यतीत ऋतुराज आघाडीवर, आजच्या सामन्यानंतर कोण कुठे? जाणून घ्या

IPL 2024 Orange Cap, Highest run scorer : राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद सामन्यानंतर ऑरेंज कॅप मानकरी ऋतुराज गायकवाडच आहे. पण रियान परागने अर्धशतकी खेळी करत टॉप 5 मध्येएन्ट्री मारली आहे.

IPL 2024 Orange Cap: ऑरेंज कॅपच्या शर्यतीत ऋतुराज आघाडीवर, आजच्या सामन्यानंतर कोण कुठे? जाणून घ्या
Follow us
| Updated on: May 02, 2024 | 11:42 PM

ऑरेंज कॅपची शर्यत गेल्या काही दिवसांपासून एकतर्फी झाली होती. मात्रे चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने विराट कोहलीला धोबीपछाड दिला असून अव्वल स्थान गाठलं आहे. ऋतुराज गायकवाडने 10 सामन्यात 4 अर्धशतकं आणि 1 शतकाच्या जोरावर 509 धावा केल्या आहेत. तर रनमशिन्स विराट कोहलीने 10 सामन्यात 1 शतक आणि 4 अर्धशतकांच्या जोरावर 500 धावा केल्या. या दोघांमद्ये 9 धावांचं अंतर आहे. हे अंतर विराट कोहली तोडून पुढे जातो की ऋतुराज गायकवाड त्यात धावांची भर घालून आघाडीवर राहतो याची उत्सुकता आहे. तिसऱ्या क्रमांकावार गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन आहे त्याने 10 सामन्यात 418 धावा केल्या आहेत.

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना पार पडला. या सामन्यात रियान परागची बॅट चांगलीच तळपली. त्याने 49 चेंडूत 8 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 77 धावा केल्या. यासह त्याने टॉप 5 मध्ये एन्ट्री मारली आहे. रियान परागाने 10 सामन्यातील 9 इनिंगमध्ये फलंदाजी करत 409 धावा केल्या आहेत. तर लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने 10 सामन्यात 406 धावा केल्या आहेत. यासह पाचव्या स्थानावर आहे. त्यामुळे साखळी फेरीतील उर्वरित सामन्यात ही लढत आणखी चुरशीची होणार आहे.

दरम्यान सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना अतितटीचा झाला. राजस्थान रॉयल्सने हा सामना अवघ्या एका धावेने गमावला. शेवटच्या चेंडूवर 2 धावांची आवश्यकता असताना रोव्हमॅन पॉवेल पायचीत झाला आणि सामना हैदराबादने जिंकला. गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स संघ अव्वल स्थानी आहे. मात्र चेन्नई सुपर किंग्सला फटका बसला आहे. चेन्नईची पाचव्या स्थानी तर हैदराबादची टॉप 4 मध्ये एन्ट्री झाली आहे. राजस्थान रॉयल्सचं प्लेऑफमधलं स्थान निश्चित आहे. मात्र आता उर्वरित तीन जागांसाठी चुरस असणार आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा.

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, अनमोलप्रीत सिंग, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को जॅनसेन, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, टी नटराजन.

Non Stop LIVE Update
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका
राज ठाकरेंच्या इंजिनमध्ये भाजपचा कोळसा,कुणी केली जिव्हारी लागणारी टीका.
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका
तोंडाच्या वाफेने काही करता येतं पण... काँग्रेस नेत्याची ठाकरेंवर टीका.
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?.
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?.
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर.
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल.
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल.
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ...
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ....
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.