IPL 2024 Purple Cap: पर्पल कॅपच्या रेसमध्ये कोण आघाडीवर? या खेळाडूंमध्ये जोरदार चुरस

IPL 2024 Purple Cap, Most wicket taker : आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक चुरशीची लढाई ही पर्पल कॅपसाठी आहे. गोलंदाजांमध्ये विकेट्सचं अंतर जास्त नाही. त्यामुळे ही स्पर्धा चुरशीची आहे. चेन्नईविरुद्ध जसप्रीत बुमराहला यश मिळालं नाही. त्यामुळे पर्पल कॅप चहलच्या डोक्यावर आहे.

IPL 2024 Purple Cap: पर्पल कॅपच्या रेसमध्ये कोण आघाडीवर? या खेळाडूंमध्ये जोरदार चुरस
Follow us
| Updated on: Apr 14, 2024 | 11:37 PM

आयपीएल स्पर्धेत पर्पल कॅपची शर्यत चुरशीची झाली आहे. प्रत्येक सामन्यानंतर यात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. एखाद्या गोलंदाजाने चांगला स्पेल टाकत पाच किंवा चार गडी बाद केले तर थेट टॉप 5 मध्ये एन्ट्री होते. तर एखाद्या सामन्यात विकेट्सची झोळी रिकामी झाली तर टॉप 5 मध्ये थेट बाहेर फेकला जातो. त्यामुळे पर्पल कॅपचा साज कोणच्या डोक्यावर असेल याबाबत प्रचंड उत्सुकता क्रीडाप्रेमींना असते. चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहला विकेट्स घेता आल्या नाहीत. जसप्रीत बुमराहने 4 षटकात 27 धावा दिल्या मात्र त्याला एकही गडी बाद करता आला नाही.  त्यामुळे पर्पल कॅपचा मान काही मिळवता आला नाही. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात एक विकेट घेतली असती तर हा मान मिळाला असता. आता पर्पल कॅपचा हा मान युझवेंद्र चहल आणखी दिवस मिरवणार आहे.

युझवेंद्र चहलने 6 सामन्यात 7.40 च्या इकोनॉमी रेटने 11 विकेट्स घेतल्या आहेत. यासह युझवेंद्र चहल पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर जसप्रीत बुमराह असून त्याने 6 सामन्यात 6.08 च्या इकोनॉमी रेटने 10 विकेट्स घेतल्या. मुस्तफिझुर रहमान तिसऱ्या स्थानावर असून त्याच्या नावावर 10 विकेट्स आहेत. मात्र त्याचा इकोनॉमी रेट 8.94 इतका आहे. पंजाब किंग्सचा कगिसो रबाडाच्या नावावर 9 विकेट्स असून त्याने 7.95 च्या इकोनॉमी रेटने गडी बाद केले आहेत. रबाडा गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. तर पाचव्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्सचा खलिल अहमद आहे. त्याने सहा सामन्यात 8.79 इकोनॉमी रेटने 9 गडी बाद केले आहेत.

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्सचा पराभव झाला आहे. या स्पर्धेतील मुंबई इंडियन्सचा हा चौथा पराभव आहे. त्यामुळे गुणतालिकेत जबर फटका बसला आहे. मुंबई इंडियन्सची आठव्या स्थानावर घसरण झाली आहे. तर चेन्नई सुपर किंग्स संघ 8 गुणांसह तिसऱ्या स्थानावर कायम आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा पुढचा प्रवास आणखी खडतर झाला आहे.  मुंबई इंडियन्सचे पुढचा सामना आता मुंबईबाहेर असणार आहे. मुंबईचा पुढचा सामना 18 एप्रिलला पंजाब किंग्सशी आहे.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.