IPL 2022 Retention: सनरायझर्स हैदराबादचा वॉर्नर, बेयरस्ट्रोला बाय बाय, हे खेळाडू रिटेन

| Updated on: Nov 30, 2021 | 7:48 PM

सनरायझर्स हैदराबादने त्यांच्या संघात मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सनरायझर्स काही बड्या खेळाडुंना रिलीज करणार असल्याची माहिती समोर आली आहे. सनरायझर्स हैदराबाद समालीचा फलंदाज आणि गोलंदाजांना चोप देणारा खेळाडू अशी ओळख असलेल्या डेव्हीड वॉर्नरला रिलीज करणार आहे.

IPL 2022 Retention: सनरायझर्स हैदराबादचा वॉर्नर, बेयरस्ट्रोला बाय बाय, हे खेळाडू रिटेन
डेव्हिड वॉर्नर
Follow us on

मुंबई : आयपीएलचं रिटेंन्शशन जसजस जवळ येईल तसतशी नवी माहिती समोर येत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये कोण कोणते फेरबदल होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच काही टीम आपल्या खेळाडुंना रिलीज करणार आहेत. त्यात काही दिग्गज खेळाडुंची नावं समोर येत आहेत. काही नव्या चेहऱ्यांनाही यंदाच्या आयपीएलमध्ये मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर कित्येक खेळाडुंना टीम इंडियातही खेळण्याची दारं खुली होतात त्यामुळे आयपीएल खेळणं कित्येक खेळाडुंचं स्पप्न असतं.

सनरायझर्स हैदराबादमध्ये मोठे फेरबदल

सनरायझर्स हैदराबादने त्यांच्या संघात मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सनरायझर्स काही बड्या खेळाडुंना रिलीज करणार असल्याची माहिती समोर आली आहे. सनरायझर्स हैदराबाद समालीचा फलंदाज आणि गोलंदाजांना चोप देणारा खेळाडू अशी ओळख असलेल्या डेव्हीड वॉर्नरला रिलीज करणार आहे. तर दुसरीकडे सनरायझर्स जॉनी बेयरस्ट्रोलाही रिलीज करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

सनरायझर्समध्ये नव्या चेहऱ्यांना संधी

सनरायझर्स हैदराबाद यंदा काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या तयारीत आहे. उमरान मलिक आणि अब्दुल समद यांना सनरायझर्स हैदराबाद रिटेन करत आहे. यांच्या नावावर अजून काही खास कामगिरी दिसून आली नाही. त्यामुळे सनरायझर्सचं मिशन 2022 ipl काय असणार आहे, याबाबत अजून बरीच अनिश्चितता आहे.

केन विलीयमसनला रिटेन करणार

केन विलीयमसनला हैदराबाद रिटेन करणार आहे. केन विलीमसनची आतापर्यंतची कामगिरी बरीच चमकदार राहिली आहे. त्यामुळे संघाची धुराही केनकडेच देण्याची जास्त शक्यता वर्तवण्यात येत आहे. आयपीएलची रिटेंन्शन प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच कोण कोणत्या संघातून बाहेर पडणार हे स्पष्ट होईल.

IPL 2022 Retention : यंदाच्या आयपीएलमध्ये मोठी खांदेपालट, राशीद खानसह अनेक खेळाडू बदलणार टीम

मोदी सरकार आता CEL कंपनीला विकणार, एअर इंडियानंतर दुसऱ्या मोठ्या कंपनीचं खासगीकरण

Breaking | देबाशिष चक्रवर्ती राज्याच्या मुख्य सचिव पदाचा पदभार स्वीकारला