IPL 2022 Retention : यंदाच्या आयपीएलमध्ये मोठी खांदेपालट, राशीद खानसह अनेक खेळाडू बदलणार टीम

यंदाच्या आयपीएलमध्ये खेळाडूंमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहेत. अनेक टीम काही दिग्गज खेळाडुंना सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे यंदाचं आयपीएल रिटेंन्शन अधिक रंजक झालं आहे. 

IPL 2022 Retention : यंदाच्या आयपीएलमध्ये मोठी खांदेपालट, राशीद खानसह अनेक खेळाडू बदलणार टीम
IPL 2022 Retention Live Stream

मुंबई : सध्या जोरदार चर्चा आहे ती यंदाच्या आयपीएल रिटेंन्शनची. आपला आवडता खेळाडू कोणत्या संघाकडून खेळणार याची उत्सुक्ता सर्वच चाहत्यांना लागली आहे. कोण रिटेन होणार आणि कोण लिलावात उतरणार? हे काही वेळातच स्पष्ट होईल. मात्र आत्ताच्या घडीला आयपीएल (IPL) रिटेन्शनबाबत काही महत्वाची माहिती समोर आली आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये खेळाडूंमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहेत. अनेक टीम काही दिग्गज खेळाडुंना सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे यंदाचं आयपीएल रिटेंन्शन अधिक रंजक झालं आहे.

जोफ्रा अर्चर, बेन स्टोक्स दुसऱ्या संघात

क्रिकबजच्या हवालानं एक महत्वाची बातमी समोर आलीय. राजस्थान रॉयल्स संघ काही खेळाडुंना रिलीज करणार असल्याची माहिती समोर आली आहे. वेगवान गोलंदाज जोफ्रा अर्चरला राजस्थान रिटेन करणार नाही अशा बातम्या बाहेर आल्या आहेत. तर राजस्थान दुसरीकडे बेन स्टोक्सलाही रिलीज करण्याच्या तयारीत आहे.

सनरायझर्स हैदराबाद राशीद खानला सोडणार (Rashid khan)

सनरायझर्स हैदराबाद सध्या राशीद खानला सोडण्याच्या तयारीत आहे. राशीद खानला हैदराबादने पहिल्या स्थानी रिटेन करावे असे वाटत असले तरी राशीद खानच्या ठिकाणी सनरायझर्सने केन विलीयम्सनला रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा मोठा बदल आहे.

किंग्ज इलेव्हन पंजाब के. एल. राहुलला सोडणार (kl rahul)

तर दुसरीकडे किंग्ज 11 पंजाबनेही के. एल. राहुलला रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे पंजब टीमला आता नवा कर्णधारही शोधावा लागणार आहे. त्याचबरोबर पंजाब टीम गोलंदाज अर्शदीप सिंह आणि सलामीचा फलंदाज मयांक अग्रवाललाही रिटेन करणार आहे.

Mamta Banerjee | मुख्यमंत्री बरे होण्याची सिद्धिविनायकाकडे प्रार्थना, जय मराठा, जय बंगला – बॅनर्जी

मुंबई महापालिकेचा शाळेबाबत मोठा निर्णय, 15 डिसेंबरपासून शाळा सुरू

India Q2 GDP: खूशखबर! देशाची अर्थव्यवस्था रुळावर, दुसऱ्या तिमाहीत GDP 8.4 टक्क्यांवर पोहोचला!

Published On - 7:20 pm, Tue, 30 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI