Mamta Banerjee | मुख्यमंत्री बरे होण्याची सिद्धिविनायकाकडे प्रार्थना, जय मराठा, जय बंगला – बॅनर्जी

ममता बॅनर्जी या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी आजपासून मुंबईत आल्या आहेत. मुंबईत पोहोचताच त्यांनी सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्या म्हणाल्या की उद्धव ठाकरे लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करण्यासाठी आले. मला इथे येऊन बरे वाटले. दर्शनासाठी मला चांगली सुविधा दिली. मी खूप आनंदी आहे असं म्हणत ‘जय मराठा, जय बांग्ला’ नारा ममता बॅनर्जींनी दिला. 

ममता बॅनर्जी या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी आजपासून मुंबईत आल्या आहेत. मुंबईत पोहोचताच त्यांनी सिद्धिविनायक गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्या म्हणाल्या की उद्धव ठाकरे लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करण्यासाठी आले. मला इथे येऊन बरे वाटले. दर्शनासाठी मला चांगली सुविधा दिली. मी खूप आनंदी आहे असं म्हणत ‘जय मराठा, जय बांग्ला’ नारा ममता बॅनर्जींनी दिला. बंगालमध्येही गणपतीची उत्साहात पूजा केली जाते. मी मंदिर समितीचे, ट्रस्टीचे, पंडित, गुरुजी आणि महाराष्ट्र सरकारचे आभार मानतो, असंही त्या म्हणाल्या.

ममता यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर, शहीद तुकाराम ओंबळे स्मारकाला भेट दिली आहे. यानंतर आज संध्याकाळीच त्या ट्रायडंट हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट घेणार आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांचा मुंबई दौरा महत्वाचा मानला जात आहे.

Published On - 7:18 pm, Tue, 30 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI