
डब्लिन | आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील टी 20 मालिकेतील दुसरा आणि निर्णायक सामना आज 20 ऑगस्ट रोजी खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. पहिल्या मॅचमध्ये पावसामुळे टीम इंडियाचा डकवर्थ लुईस नियमानुसार 2 धावांनी विजय झाला. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यातही पाऊस गेमओव्हर करणार का, अशी भीती क्रिकेट चाहत्यांना सतावतेय. दुसऱ्या सामन्यादरम्यान हवामान कसं असेल, पाऊस होण्याची किती टक्के शक्यता आहे, हे आपण जाणून घेऊयात.
दुसऱ्या टी 20 सामन्याला स्थानिक वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. तर भारतात सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. क्रिकेट चाहत्यांसाठी दिलासादायक बाब आहे. सामन्यादरम्यान हवामान स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे. एक्यूवेदरनुसार, डबलिनमध्ये दुपारी 3 ते संध्याकाळी 7 या 4 तासांदरम्यान हवामान स्वच्छ असेल.
दरम्यान पावसामुळे पहिल्या सामना पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे टीम इंडियाच्या युवा खेळाडूंना खेळण्याची संधीच मिळाली नाही. पहिल्या सामन्यात टीम इंडियाला फक्त 6.5 ओव्हर इतकीच बॅटिंग करता आली. जसप्रीत बुमराह याच्या नेतृत्वात टीम इंडियाने आयर्लंडवर डकवर्थ लुईसनुसार 2 धावांनी विजय मिळवला. त्याआधी आयर्लंडने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 139 धावा केल्या होत्या.
दरम्यान टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून आयर्लंड विरुद्ध मालिका जिंकण्याची संधी आहे. टीम इंडियाने याआधी विराट कोहली याच्या नेतृत्वात 2018 आणि हार्दिक पंड्या याच्या कॅप्टन्सीत 2022 मध्ये आयर्लंड विरुद्ध टी 20 मालिका जिंकली आहे.
टी 20 सीरिजसाठी आयर्लंड क्रिकेट टीम | पॉल स्टर्लिंग (कर्णधार), अँड्रयू बालबर्नी, मार्क अडायर, रॉस अडायर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, थिओ व्हॅन वोरकॉम, बेन व्हाइट आणि क्रेग यंग.
आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडिया | जस्प्रीत बुमराह (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग , मुकेश कुमार आणि आवेश खान.