
Irfan Pathan CSK Team for IPL 2026: आयपीएल 2026 स्पर्धेच्या 19 व्या पर्वात काही दिग्गज खेळाडूंकडे लक्ष असणार आहे. पहिल्या पर्वापासून खेळणारा महेंद्रसिंह धोनी देखील मैदानात उतरणार आहे. पण चेन्नई सुपर किंग्स त्याला प्लेइंग 11 मध्ये ठेवेल का? इम्पॅक्ट प्लेयर म्हणून जागा देईल? अशा प्रश्नांनी क्रीडाप्रेमींना ग्रासलं आहे. असं असताना टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने त्याचं उत्तर दिलं आहे. चेन्नई सुपर किंग्सची प्लेइंग 11 निवडत त्याने या प्रश्नाचं त्याच्या माध्यमातून कोडं सोडवलं आहे. इतकंच काय तर महेंद्रसिंह धोनी प्लेइंग 11 मधून डावललं आहे. तसेच त्याला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून देखील जागा दिलेली नाही. मग इरफान पठाणने ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात कोणत्या खेळाडूंना संघात जागा दिली आहे ते जाणून घ्या.
इरफान पठाणने आपल्या युट्यूब चॅनेवर आयपीएल 2026 स्पर्धेसाठी चेन्नई सुपर किंग्सच्या बेस्ट 12 खेोळाडूंची निवड केली. इरफान पठाणने या संघात ओपनर म्हणून संजू सॅमसन आणि आयुष म्हात्रे यांची निवड केली आहे. तर कर्णधार ऋतुराज गायकवाडला तिसऱ्या स्थानावर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. चौथ्या क्रमांकावर शिवम दुबे आणि पाचव्या क्रमांकासाठी डेवॉल्ड ब्रेव्हिसची निवड केली आहे. सहाव्या क्रमांकासाठी इरफान पठाणने सरफराज खानला पसंती दिली आहे. त्याने या ठिकाणी महेंद्रसिंह धोनीऐवजी सरफराज खान योग्य असल्याचं म्हंटलं आहे. कारण मागच्या दोन पर्वात धोनी फक्त शेवटच्या दोन षटकांसाठी मैदानात फलंदाजीला आला होता. चाहत्यांचा उत्साह वाढवण्यासाठी ही बाब ठीक आहे. पण फ्रेंचायझीच्या दृष्टीने योग्य नाही.
इरफान पठाणच्या मते, धोनीने कमीत कमी चार षटकं खेळली पाहिजेत. जर धोनी खेळत असेल आणि सलग खेळत असेल तर ठीक आहे. हे फ्रेंचायझीच्या फायद्याचं असेल. पण असं झालं नाही तर मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित होईल. प्रत्येक महान खेळाडूसाठी एक वेळ येते आणि तेव्हा त्याला खेळ सोडणं भाग असतं. इरफान पठाणने स्पष्ट केलं की, धोनीने आता सीएसके संघाच्या बांधणीकडे लक्ष द्यायला हवं. त्यामुळे अधिक फलंदाजांना संधी मिळेल. पण धोनीने खेळण्याचा निर्णय घेतला तर सरफराज खानला सीएसके आयपीएल डेब्यूसाठी काही काळ वाट पाहावी लागेल.
इरफान पठाणच्या मते, सातव्या क्रमांकावर कार्तिक शर्मा, आठव्या क्रमांकावर प्रशांत वीर असेल. तर फिरकी गोलंदाजीची धुरा त्याने अकील हुसैन, नूर अहमद यांच्या खांद्यावर टाकली आहे. तर वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीला संघात ठेवलं आहे. त्याचबरोबर इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खलील अहमदला जागा दिली आहे.