AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR vs RR : फिनिशर रिंकु, सिक्स ठोकून जिंकवलं, राजस्थानचा धुव्वा, पाहा व्हीडिओ

Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals : राजस्थान रॉयल्सने कोलकाता नाईट रायडर्ससमोर 156 धावांचं आव्हान ठेवलं होतं. उपकर्णधार रिंकु सिंह याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर केकेआरने हा सामना जिंकला.

KKR vs RR : फिनिशर रिंकु, सिक्स ठोकून जिंकवलं, राजस्थानचा धुव्वा, पाहा व्हीडिओ
Rinku Singh KKR vs RR IPL 2026Image Credit source: IPL X Account
| Updated on: Apr 19, 2026 | 10:39 PM
Share

उपकर्णधार रिंकु सिंह याने केलेल्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने अखेर सातव्या सामन्यानंतर आयपीएल स्पर्धेत (IPL 2026) विजयाचं खातं उघडलं आहे. राजस्थान रॉयल्सने केकेआरसमोर 156 धावांचं आव्हान ठेवलं होतं. केकेआरला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 9 धावांची गरज होती. मात्र केकेआरने हे आव्हान 2 बॉलआधी पूर्ण केलं. केकेआरने 19.4 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 161 धावा केल्या. रिंकूने शेवटच्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर सिक्स ठोकत केकेआरला पहिलावहिला विजय मिळवून दिला.  रिंकु सिंह आणि अनुकूल रॉय या जोडीने केकेआरला विजयी करण्यात बॅटिंगने प्रमुख भूमिका बजावली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 37 बॉलमध्ये नॉट आऊट 76 रन्सची विजयी भागीदारी केली. तर सलग 4 सामने जिंकणाऱ्या राजस्थानला सलग दुसऱ्यांदा पराभूत व्हावं लागलं आहे.

राजस्थानची कडक सुरुवात

राजस्थानच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागल्यानंतर कॅप्टन रियान पराग याने बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र ओपनिंग जोडीचा अपवाद वगळता केकेआरच्या गोलंदाजांसमोर कुणालाही तग धरता आला नाही. वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जैस्वाल या दोघांनी राजस्थानसाठी सलामी अर्धशतकी भागीदारी केली. राजस्थानने वैभवच्या रुपात पहिली विकेट गमावली. वैभवने 28 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 6 फोरसह 46 रन्स केल्या. यशस्वीने 29 चेंडूत 39 धावांचं योगदान दिलं. या दोघांशिवाय एकालाही 20 पार पोहचता आलं नाही.

केकेआरच्या गोलंदाजांचा धमाका

केकेआरच्या गोलंदाजांनी कमाल केली. केकेआरसाठी दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स मिळवल्या. कार्तिक त्यागी आणि वरुण चक्रवर्ती या दोघांनी राजस्थानच्या 3-3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर सुनील नारायण याने 2 विकेट्स मिळवल्या.

केकेआरची ओपनिंग जोडी ढेर

केकेआरच्या सलामी जोडीने विजयी धावांचा पाठलाग करताना निराशा केली. टीम सायफर्ट आणि कॅप्टन अजिंक्य रहाणे दोघेही भोपळा फोडण्यात अपयशी ठरले. त्यानंतर चौघांना अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र चौघांपैकी एकाहाली केकेआरसाठी ठोस खेळी करता आली नाही. अंगकृष रघुवंशी आणि रमनदीप सिंह या दोघांनी प्रत्येकी 10-10 धावा केल्या. कॅमरुन ग्रीन याने 27 तर रोव्हमॅन पॉवेल याने 23 धावांचं योगदान दिलं.

रिंकूचा विजयी सिक्स

रिंकु-अनुकूलची विजयी भागीदारी

रमनदीपच्या रुपात केकेआरने सहावी विकेट गमावली. त्यानंतर रिंकुची साथ देण्यासाठी अनुकूल मैदानात आला. दोघांनी संयमी बॅटिंग केली. दोघांनी केकेआरला विजयापर्यंत आणलं. केकेआरला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 9 धावांची गरज होती. दोघांनी पहिल्या 3 चेंडूत 8 धावा जोडल्या. त्यामुळे 3 बॉलमध्ये 1 रन हवी होती. तेव्हा रिंकून सिक्स लगावला. केकेआरने अशाप्रकारे पहिल्या विजयाची नोंद केली.रिंकु आणि अनुकूल जोडीने 37 चेंडूत 76 धावांची नाबाद भागीदारी केली.

स्कोअरकार्ड

रिंकुने 34 बॉलमध्ये 5 फोर आणि 2 सिक्ससह नॉट आऊट 53 रन्स केल्या. तर अनुकूलने 16 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकार लगावत नाबाद 29 धावा केल्या. तर राजस्थानसाठी रवींद्र जडेजाने दोघांना आऊट केलं. तसेच जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, रवी बिश्नोई आणि यश राज पुंजा या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...