लखनऊकडून केएल राहुलला नारळ? कोण होणार संघाचा नवा कर्णधार

IPL 2025 मधील स्टार फलंदाज केएल राहुलबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. येत्या आयपीएल हंगामात केएल राहुल संजीव गोयंका यांच्या संघातून बाहेर जाऊ शकतो. फ्रेंचायजीने देखील याबाबत निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. त्यामुळे केएल राहूल कोणाकडून खेळणार आणि लखनौचा नवा कर्णधार कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

लखनऊकडून केएल राहुलला नारळ? कोण होणार संघाचा नवा कर्णधार
| Updated on: Sep 09, 2024 | 9:12 PM

IPL 2024 मध्ये लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकला नव्हता. त्यानंतर लखनऊ फ्रँचायझीचे मालक संजीव गोएंका यांनी केएल राहुलवर राग व्यक्त करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर चाहत्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) मध्ये राहुलने सहभागी व्हावे म्हणून घोषणाबाजी केली होती. आता असा दावा केला जातोय की, केएल राहुल खरोखरच लखनौ सोडणार आहे  आणि त्याची घोषणा देखील लवकरच होऊ शकते. केएल राहुल याने लखनौचा संघ सोडल्याचा दावा सोशल मीडियावर होत आहे. राहुल आणि एलएसजी या दोघांकडून मात्र कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण राहुल लखनौ संघ सोडणार हे जवळपास निश्चित झाले आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये हा संघ नवीन होता. तेव्हाच संघाने केएल राहुलला विकत घेत कर्णधार केले होते. राहुलच्या नेतृत्वाखाली एलएसजीने दोनदा प्लेऑफ गाठले, परंतु 2024 मध्ये संघाला त्या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही.

संजीव गोयंका काय निर्णय़ घेणार?

काही आठवड्यांपूर्वी, जेव्हा केएल राहुल लखनौ संघ सोडत असल्याच्या अफवा शिगेला पोहोचल्या होत्या, तेव्हा एका मीडिया रिपोर्टमध्ये असे समोर आले होते की संजीव गोयंका यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण त्यांनी केएल राहुलला कुटुंबाचा एक भाग म्हटले होते. पीटीआयने एक अहवाल प्रसिद्ध केला होता ज्यामध्ये एकीकडे राहुलला एलएसजीने कायम ठेवण्याची आशा व्यक्त केली होती, परंतु यावेळी एलएसजी फ्रँचायझीने कोणतीही स्पष्ट भूमिका मांडली नाही, ज्यामुळे राहुल संघ सोडण्याची शक्यता वाढली होती.

कोण होणार नवा कर्णधार?

येत्या आयपीएल हंगामात केएल राहुलच्या आता कोणाला नेतृत्व करण्याची संधी दिली जाते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यामुळेच फ्रँचायझी नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. लखनौ संघाचा नवा कर्णधार कोण असेल?  संघातूनच कोणाला कर्णधार केलं जातं की मेगा लिलावातून विकत घेतलं जातं? याबाबत अजून निर्णय झालेला नाही.

केएल राहुलने कर्णधारपद सोडल्यास तो मेगा ऑक्शनमध्ये जाणार. त्यामुळे तो इतर संघांकडून खेळताना दिसू शकतो. आता तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून (RCB) खेळू शकतो अशी देखील चर्चा आहे. दिनेश कार्तिकने निवृत्ती घेतल्यामुळे तो विकेटकीपिंगही करू शकतो. आरसीबीला देखील भारतीय यष्टीरक्षकाची गरज आहे. आयपीएल 2025 मध्ये अनेक संघ आहेत जे लिलावात भारतीय यष्टीरक्षक आणि फलंदाजाच्या शोधात असतील. त्यामुळे राहुल त्या संघांमध्ये देखील जाऊ शकतो.