AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KKR vs LSG Live Streaming : कोलकाता-लखनौ आमनेसामने, केकेआर घरच्या मैदानात पहिला सामना जिंकणार?

Kolkata Knight Riders vs Lucknow Super Giants IPL 2026 Live Scorecard : कोलकाता नाईट रायडर्सला अद्याप विजयाचं खातं उघडता आलेलं नाही. तर लखनौ केकेआरच्या घरच्या मैदानात पहिला आणि एकूण सलग दुसरा सामना जिंकणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

KKR vs LSG Live Streaming : कोलकाता-लखनौ आमनेसामने, केकेआर घरच्या मैदानात पहिला सामना जिंकणार?
KKR vs LSG IPL 2026Image Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Apr 09, 2026 | 3:03 AM
Share

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील (IPL 2026) 15 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स आमेनसामने असणार आहेत. कोलकाताचा हा चौथा तर लखनौचा तिसरा सामना असणार आहे. अजिंक्य रहाणे केकेरआरच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. तर ऋषभ पंत याच्या खांद्यावर लखनौचं नेतृत्वाची जबाबदारी आहे. लखनौची या मोसमात पराभवाने सुरुवात झाली. त्यानंतर लखनौने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे लखनौचा केकेआर विरुद्ध विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला केकेआरसमोर विजयाचं खातं उघडण्याचं आव्हान असणार आहे.

केकेआरने आतापर्यंत एकूण 3 सामने खेळले आहेत. मात्र केकेआरची पहिल्या विजयाची प्रतिक्षा अद्याप कायम आहे. केकेआरने पहिले सलग 2 सामने गमावले. त्यानंतर केकेआरचा पंजाब किंग्स विरुद्धचा सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला. त्यामुळे केकेआरच्या विजयाची प्रतिक्षा कायम आहे. त्यामुळे आता केकेआर घरच्या मैदानात विजयाचं खातं उघडण्यात यशस्वी ठरणार की लखनौ सलग दुसरा सामना जिंकणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.

कोलकाता विरुद्ध लखनौ सामना कधी?

कोलकाता विरुद्ध लखनौ सामना गुरुवारी 9 एप्रिलला होणार आहे.

कोलकाता विरुद्ध लखनौ कुठे?

कोलकाता विरुद्ध लखनौ सामना केकेआरच्या होम ग्राउंडमध्ये अर्थात इडन गार्डन्समध्ये होणार आहे.

कोलकाता विरुद्ध लखनौ सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

कोलकाता विरुद्ध लखनौ सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.

कोलकाता विरुद्ध लखनौ सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

कोलकाता विरुद्ध लखनौ सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरीस चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल.

कोलकाता विरुद्ध लखनौ सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

कोलकाता विरुद्ध लखनौ सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

हेड टु हेड रेकॉर्ड्स

दरम्यान केकेआर विरुद्ध लखनौ यांच्यात आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात एकूण 6 सामने खेळवण्यात आले आहेत. लखनौने या 6 पैकी सर्वाधिक सामने जिंकले आहेत. लखनौने केकेआरचा 4 सामन्यांमध्ये धुव्वा उडवला आहे.  तर केकेआरला 2 सामनेच आपल्या नावावर करण्यात यश आलं आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?